#१६# दिलीपकुमार (यूसुफ़ख़ान ते दिलीपकुमार )
युसूफखान यांचा जन्म पेशावरचा, एका मोठ्या खानदानी घरातला. ते सहा वर्षांचे असतील तेव्हा ते सारं कुटुंब मुंबईला आलं. शाळेत असतांना दिलीपकुमार फुटबॉल खेळत. त्यांना या खेळांत खूप रुची होती. वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत त्यांनी एकही चित्रपट पाहिला नव्हता. पुढे शिक्षण संपवून घरचा फळांचा व्यवसाय ते पाहू लागले कारण त्यांच्या वडिलांची प्रकृती तेव्हा फारशी ठीक नसायची. त्याच वेळी पुण्यात मिलिटरी कॅन्टीन मध्ये त्यांना एका कॉन्ट्रॅक्टर कडे मॅनेजर ची नोकरी मिळाली, पगार होता महिना ३६ रूपये. काही दिवसांत त्यांनी तिथे फळांचा एक स्टॉल सुद्धा सुरु केला, घरचा तोच व्यवसाय असल्याने त्यांना ते सहज जमलं. पहिल्याच दिवशी त्यांना चक्क २२ रुपयांचा फायदा झाला. हे सगळं छान सुरु होतं. पैसे पण चांगले मिळत होते, एवढ्यात कॅन्टोन्मेंट भागांत सरकारी परवाना असेल त्यांनाच हे काम करायला परवानगी आहे असा नियम निघाला. ती नोकरी गेली आणि त्यांना परत मुंबईला जावं लागलं. घरचा फळांचा व्यवसाय होताच , ते काम त्यांनी परत सुरु केलं.
एकदा कामानिमित्त ते नैनितालला गेले होते. तिथे योगायोगाने त्यांची भेट देविकारानी यांच्याशी झाली. त्या काळी त्यांचं फार मोठं प्रस्थ होतं. मोठया हिरोईन म्हणून त्यांची ओळख होतीच पण एका फिल्म स्टुडिओ व PRODUCTION हाऊस चे मालक हिमांशु रॉय हे त्यांचे पती असल्यामुळे, बॉम्बे टॉकीजचं काम सुद्धा त्याच पाहतं. पहिल्या भेटीतच युसुफखान यांना चित्रपटात काम कराव असं त्यांनी सुचवलं आणि स्टुडिओ मध्ये येऊन भेट असं सांगितलं. योगायोगाने मुंबईला परत येत असताना रेल्वेमध्ये त्यांची भेट डॉ. मसानी यांच्याशी झाली आणि त्यांनी सुद्धा युसुफखान यांना चित्रपटांत काम करावं असं सुचवलं. खास गोष्ट म्हणजे ते देविका रानी यांचे पती हिमांशू रॉय यांचे डॉक्टर होते. नैनिताल ची गोष्ट त्यांना माहीत नव्हती पण युसूफखान यांना पाहून त्यांनी ते सुचवलं होतं.
परत आल्यावर या दोन्ही प्रसंगांचा युसुफखान यांनी थोडा विचार केला, कुछ तो बात है आणि एक दिवस ते देविका रानी यांना भेटायला गेले. स्क्रीन टेस्ट झाली, रोल मिळाला आणि 3 वर्षांकरता महिना 500 रुपये पगारावर कॉन्ट्रॅक्ट सुद्धा सही झालं. त्या वेळी त्यांना नाव बदलावं असं सुचवण्यात आलं, रोमँटिक हिरोला साजेसं नाव. त्या production house च्या writers नी पण काही नाव सुचवली. वसुदेव, जहाँगीर आणि दिलीप,यापैकी दिलीप हे नाव युसुफखान यांना आवडलं होतं. याच सुमारास अशोककुमार बॉम्बे टॉकीज सोडून फिल्मीस्थानला गेले होते. त्यामुळे एक कुमार गेले व दुसरा नवोदित कुमार मिळाला या भावनेतून दिलीपकुमार हे नाव ठरलं आणि 'युसुफखान' चा 'दिलीपकुमार' झाला....
No comments:
Post a Comment