Thursday, July 30, 2020

#18# मुघल- ए - आझम आणि मधुबाला 


खरं तर मुघल- ए - आझम म्हटलं तरी मधुबाला समोर येते किंवा मधुबाला म्हटलं तरी मुघल- ए - आझम चित्रपट समोर येतो, इतकी एकरूप आहेत हि नावं. १९५३ मध्ये हीच कथा असलेला अनारकली चित्रपट आला होता प्रदीप कुमार आणि बिना रॉय यांची भूमिका असलेला. परंतु मुघल- ए - आझम चित्रपटांत हि प्रेमकथा ज्या अंदाजात, ज्या नजाकतीने बखुबी पेश केली गेली ती कमाल होती आणि म्हणूनच आज ६० वर्षांनंतर सुद्धा हा चित्रपट आपण विसरू शकत नाही.

मधुबालाच्या जीवनातला हा सर्वोत्कृष्ट चित्रपट. पण या भूमिकेसाठी तिची निवड कशी झाली त्या मागे एक गोष्ट आहे. या भूमिकेसाठी ६५०० अर्जातून ५०० तरुणींची प्राथमिक निवड करण्यात आली होती. दिल्लीच्या शीला दलाया या कॉलेज कुमारीची निवड करण्यात आली परंतु काही प्रसंगांचं शूट केलं गेलं आणि समजलं तिची देहबोली , चेहऱ्यावरील भाव जुळत नाहीयेत. त्याच सुमारास नावारूपाला आलेल्या नूतन यांचं नाव मग पुढे आलं. तेव्हा नूतन यांनी त्यास नकार दिला व सांगितलं हि भूमिका सर्वार्थाने निभावणारी एकचं अभिनेत्री आहे आणि ती म्हणजे 'मधुबाला'.. काय कमाल आहे नाही !!

No comments:

Post a Comment