#22# मुघल- ए - आझम १९६० - मुघल- ए - आझम २००४
या चित्रपटातील ‘मोहे पनघटपे’ आणि ‘प्यार किया तो डरन क्या' हि दोन गाणी रंगीत शूट झाली. नंतर चित्रपटाची ट्रायल बघताना ८५ % कृष्णधवल व १५ % रंगीत असं पाहून असिफ़ना पूर्ण चित्रपट रंगीत असावा असं वाटलं. परंतु १२ वर्ष ज्यावर काम केलं तो पूर्ण चित्रपट रिशूट करणं म्हणजे पैशाचा वेळेचा अपव्यय कारण त्या काळी १० लाखांत संपूर्ण सिनेमा तयार व्हायचा तिथे के असिफ यांनी हा सिनेमा पूर्ण करतांना दोन कोटी रुपये खर्च केले होते. ( त्या काळी या चित्रपटाने ५.५० कोटीचा धंदा करून रेकॉर्ड केलं जे पुढे शोले चित्रपटाने मोडलं) चित्रपटाच्या प्रीमियरला शापूरजींना असिफ यांच म्हणणं पटलं व त्यांनी असिफला हा रंगीत चित्रपट करायचं आश्वासन दिलं(आश्चर्य म्हणजे चित्रपटाच्या प्रीलियरला मधुबाला आणि दिलीपकुमार दोघेही नव्हते).
१९६० मध्ये दिलेलं ते वचन पाळून २००४ मध्ये शापूरजींच्या नातवाने स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट बॅनरखाली १० कोटी रुपये खर्च करून रंगीत मुघल- ए- आझम ची निर्मिती केली. पण हा रंगीत चित्रपट पाहायला ना शापूरजी होते, ना के असिफ ना मधुबाला ... होते फक्त दिलीपकुमार !
No comments:
Post a Comment