Thursday, July 30, 2020



#३१# शैलेंद्र (२)

त्यानंतर 'आवारा' चित्रपटाची तयारी सुरु होती. राजजी शैलेंद्रजींना घेऊन पटकथा लेखक के ए अब्बास यांच्याकडे गेले, ओळख करुन दिली.  ह्या साध्या सामान्य दिसणाऱ्या, शर्टवर वेल्डींगचे डाग असणाऱ्या माणसाकडे अब्बास साहेबांनी फारसे लक्ष दिले नाही. स्टोरी सेशन झाल्यावर अब्बास साहेबांनी शैलेंद्रजींना विचारलं "कवीराज कैसी लगी कहानी?"  शैलेंद्रजी म्हणाले, "अच्छी लगी"!  तेव्हा त्यांनी पुन्हा विचारलं, "कुछ समझमें आया?" शैलेंद्रजी पटकन म्हणाले," गर्दिश में था, आसमानका तारा था, आवारा था !" अब्बासजी अवाक झाले. ते म्हणाले माझ्या दोन अडीच तासाच्या गोष्टीच सार याने एका ओळीतच सांगितलं ! "आवारा हूँ" हेच शेवटी चित्रपटाचे शिर्षक गीत झाले.

५० ते ६० चे दशक आणि पुढची ३/४ वर्षे शैलेंद्र जींनी उत्तमोत्तम अशी सुमारे ८०० गाणी दिली. त्यावेळचे ते Highest paid गीतकार होते. त्यांनी सर्वात जास्त गाणी शंकर जयकिशन बरोबर केली नंतर सलिलदा आणि मग सचिन देव बर्मन. १९६३ मध्ये साहिरजींना त्या सालचा 'फिल्म फेअर' पुरस्कार केवळ या कारणासाठी नाकारला की त्यावर्षी शैलेंद्रंचे 'बंदिनी'मधले गाणं पुरस्कारासाठी जास्त लायक आहे असं त्यांना वाटलं.आपल्या समकालीन गीतकारासंबंधी असलेला केवढा हा आदर ...









No comments:

Post a Comment