Thursday, July 9, 2020

#8# चित्रपट आराधना  (आधीच ठरवलेलं नाव होतं सुबह प्यार की)

काही हिंदी चित्रपट आपल्या मनात कायमचं घर करून राहतात, आराधना हा त्यातलाच एक. १९६९  मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट,  आता ५० वर्षं होऊन गेली तरी आजही आराधनाची जादू कायम आहे. 

आराधना चित्रपटांत शक्ती सामंताने राजेश खन्ना यांना संधी दिली यामागे एक विशेष कारण होतं. ज्या राष्ट्रीय स्तरावरच्या अभिनय स्पर्धेत राजेश खन्ना विजयी ठरले होते त्याचे ते एक परीक्षक होते आणि विजेत्याला आपल्या सिनेमातून संधी देण्याचं परीक्षकांनी आधीच मान्य केलं होतं. 

याच चित्रपटातील 'रूप तेरा मस्ताना' या गाण्याची चाल किशोरकुमार यांनी एका बंगाली गाण्यावरून सुचवली होती हे गाणं साडेतीन मिनिटात एकही रिटेक न घेता चित्रित झालं होतं. शर्मिला टागोर बंगाली चित्रपटांत व्यस्त असल्यामुळे ' मेरे सपनो कि रानी' हे गीत आधी राजेश खन्ना आणि नंतर शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित केलं गेलं. या चित्रपटाची दोन गाणी रफी साहेबांनी गायली आहेत, गुन गुना रहे है भवरे आणि बागो में बहार है. नंतर सचिनदा आजारी पडले व ती जबाबदारी  पंचमदांवर आली. मग काय त्यांनी पुढची सर्व गाणी किशोरदांना दिली.

आराधना पासून ओळीने १७ यशस्वी सिनेमा देऊन राजेश खन्ना हा मनस्वी कलाकार सुपरस्टार पदावर पोहचला. त्या वर्षी उत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफ़ेअर पुरस्कार आराधनाला मिळाला. शर्मिला टागोर यांना उत्कृष्ट अभिनेत्रीच पहिलं फिल्मफेअर तर किशोरदांना गाण्यासाठी त्यांच पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड याच चित्रपटानं दिलं !!



No comments:

Post a Comment