#3# उमराव जान..
हा चित्रपट मिर्झा हादी रुसवा यांच्या 'उमराव जान अदा' या उर्दू कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटातील गीते शहरयार यांची तर संगीत खय्याम यांच आहे. मुझफ्फर अली या चित्रपटातील उर्दू भाषेच्या सौंदर्याबद्दल बोलताना म्हणतात "सत्यजीत रे से उर्दू का इस्तेमाल फिल्मों में करना सीखा मैने कलकत्ते से, मतलब जो सत्यजीत रे बंगाली में इस्तेमाल करते थे अपनी ज़बान और संस्कृति को दुनिया के सामने रखने के लिए, उसीसे सिख मिली। दूसरा सीखा अलीग़ढ से। दुनिया का सारा दर्द वहाँकी शायरी में है। अलीगढ़ ने मुझे बहोत बड़ा तोहफा दिया है उर्दू के माध्यम से, उर्दू की सरजमींन है अलीग़ढ।"
या सिनेमाची जी कल्पना त्यांच्या डोक्यात होती ती म्हणजे, 'स्क्रीन प्ले को गझल के फॉर्म में लिखना'.. थोडक्यात गाण्यांमधून पटकथा लिहिणं आणि या करता त्यांच्या समोर एकचं नाव होतं, शहरयार !
या स्वप्नाला मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी शहरयार यांना आपल्याच घरी राहायला आणलं. पुढे तब्बल दिड ते दोन वर्ष ते एकत्र राहिले या चित्रपटाच्या गाण्यावर काम करण्यासाठी. योगायोगाने समोरच खय्याम जी राहायचे. मग काय 'हर शाम, शाम ए शहरयार आणि शाम ए खय्याम'....
यातूनच लिहिली गेली एक से बढकर एक गाणी .....
दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए बस एक बार मेरा कहाँ मान लीजिये
इन आँखों की मस्ती के मस्ताने हज़ारो हैं इन आँखों से बावस्ता अफ़साने हजारो है
जिंदगी जब भी तेरी बज़्म में लाती है हमें ये जमीं चाँद से बेहतर नजर आती है हमें
ये क्या जगह है दोस्तों, ये कौनसा दयार है
जिंदगी देखिये क्या रंग दिखाती है हमे
जुस्तजू जिसकी थी उसको तो न पाया हमने
अशी होती गाण्यावर, आपल्या कलेवर प्रेम करणारी ती पिढी ....
No comments:
Post a Comment