Thursday, July 30, 2020

#४०# साहिर , ग. दी. माडगुळकर आणि पु. ल. देशपांडे

१९७६ साली कराडला साहित्य संमेलन झाले त्याचे मावळते अध्यक्ष होते पु ल.देशपांडे.

त्यावेळी साहिर लुधियानवी आले होते. मंचावर आल्यावर ते म्हणाले -

" अभी मै जो हिंदी कविता सुनाने जा रहा हु उसका कोई मराठी तर्जुमा जरा बताए ”

पुलंनी समोरच बसलेल्या माडगुळकरांना वर बोलावले आणि म्हणाले - " साहीरजींनी आत्ता काय सांगितले ते तर तुम्ही ऐकलच आहे.पण ह्या रूपांतरात माझी एक अट आहे. ह्या रूपांतरात एक असा मराठी शब्द हवा ज्याला भारताच्या कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही"..

मग सहिरजींनी ती कविता ऐकवली-

" एक बात कहु राजा किसीसे न कहिओ जी,
एक बात कहु राजा किसीसे न कहिओ जी,
रातभर रहियो सवेरे चले जइयो जी।

सेजियो पे दिया जलना हराम है,
खुशियों में जलनेवालो का क्या काम है?

अँधेरे में रहकर जड़ाओ, मजा पियो जी,
रातभर रहियो सवेरे चले जइयो जी।”

आणि साहिरजींचा 'जी' पूर्ण होईपर्यंत इकडे माडगूळकरांच पूर्ण मराठी भाषांतर तयार होतं.

ते असं,

एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,
एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,
ओ रातभर तुम्ही राव्हा झुंझुरता तुम्ही जावा जी

सेजेशी समई मी लावू कशाला?
जुळत्या जिवालागी जळती कशाला

अंधा-या राती इश्काची मजा घ्यावी जी,
रातभर तुम्ही राव्हा झुंझुरता तुम्ही जावा जी

ह्यातील 'झुंझुरता' या शब्दाला इतर कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही.

आणि हो, हा किस्सा इथेच संपत नाही याच्याही वरची कड़ी म्हणजे पुलंनी त्याचवेळी तिथे पेटी मागवली आणि तिथल्या तिथे कवितेला चाल लावून गाऊन सुद्धा दाखवली.....











No comments:

Post a Comment