Thursday, July 30, 2020

#१३# नूतन 

नूतन हे नाव घेताच सुजाता, बंदिनी आणि सीमा या तीन चित्रपटांची नावं समोर येतात. साधारण पणे कोणत्याही हिरोईन साठी तिचं करियर १५ ते २० वर्षांच असतं परंतु नूतन यांच करियर तब्बल ४० वर्षांचं होते. १९५० मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी चित्रपटांत काम करायला सुरवात केली आणि १९९१ पर्यंत त्या काम करत राहिल्या.

एक खास गोष्ट म्हणजे शोभना समर्थ म्हणजेच नूतनच्या आईने दिग्दर्शित केलेल्या सिनेमातून नूतन यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं (चित्रपटाचं नाव होतं 'हमारी बेटी') आणि पुढे त्यांच्या लहान बहिणीने म्हणजेच तनुजा यांनी सुद्धा आईनेच दिग्दर्शित केलेल्या ('छबिली') चित्रपटापासून आपल्या कामाची सुरवात केली.

नूतन यांनी क्लासिकल संगीताचं शिक्षण ज्या गुरूंकडून घेतलं होतं त्यांच्याकडेच गायक मुकेश सुद्धा गाणं शिकत. गाण्याबरोबर त्यांनी कथ्थकच सुद्धा शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं होतं

'नागीन' या चित्रपटांत काम करून सुद्धा तो सिनेमा नूतनजी पाहू शकल्या नव्हत्या कारण तो सिनेमा A प्रमाणपत्र असलेला होता आणि त्यांत काम करताना त्यांच वय अठरा पेक्षा कमी होतं.

नूतन यांनी काम केलेला असा एक चित्रपट आहे जो पाकिस्तान मध्ये रिलीज झाला, हिट झाला पण भारतात रिलीज झाला नाही. त्या चित्रपटाचे डायरेक्टर होते नक्षम, चित्रपटाचं नाव होतं 'जिंदगी या तुफान ', जोडी होती नूतन आणि प्रदीपकुमार. .. १९५८ साली या चित्रपटाचं शूटिंग संपवून नक्षम तो सिनेमा घेऊन पाकिस्तानात परत गेले व तो सिनेमा तिकडे रिलीज झाला.

१४ / १५ वर्षाची असताना दिलीपकुमार सोबत एका सिनेमाची ऑफर स्वीकारून सुद्धा त्यांच्याबरोबर काम कारायची संधी मात्र मिळाली नाही कारण तो सिनेमा काही पुढे झाला नाही. नंतर दिलीपकुमार यांच्या सोबत काम करायला त्यांना ३५ वर्ष वाट पाहावी लागली,तो चित्रपट होता कर्मा. 

नूतन यांच नाव घेतलं कि लता मंगेशकर नेहमी एका गाण्याचा उल्लेख आवर्जून करतात ते म्हणजे, 'मन मोहना बडे झुठे ....'
या गाण्याची आठवण सांगताना त्या म्हणाल्या होत्या, " मैने कई गाने गाये है और बहोत सी हिरोईन को मेरे गाने पे लीप मूवमेंट करते देखा है।  लेकिन इस गाने में नूतन जी ने इतना करेक्ट लिप मूवमेंट किया है वो जितना रियल लगता है वो किसी और गाने में नहीं।  ये क्लासिकल गाना है , इसमें मुरकी है, हरकतें है , वो मूवमेंट उनके गले में दिखाई देती है इतना कमाल इस गाने में उन्होंने किया है।" ..... किती छान ना !!!

आता परत एकदा ते गाणं पाहायची इच्छा झाली ना ...  नक्की पहा !!!

No comments:

Post a Comment