#15# दिलीपकुमार (यूसुफ़ ख़ान)
असं म्हणतात हिंदी चित्रपटांत सर्वात प्रथम Method Acting केली ती दिलीपकुमार साहेबांनी, म्हणजेच 'फक्त' अभिनय न करता त्या पात्राच्या भूमिकेत जाऊन विचार करणं, तसं व्यक्त होणं व खरोखरंच ते पात्र साकार करायचा प्रयत्न करणं आणि ते पात्र जगणं.
त्यांच्या याच passion मुळे पुढे 'ट्रॅजिडी किंग' म्हणून अनेकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य केलं असावं. खरं तर अशोककुमार, मोतीलाल यांच्यासारखे NATURAL ACTING करणारे महान कलाकार, थिएटर ACTING चा असणारा जनरल ट्रेंड अशा सभोवतालच्या वातावरणातं एक अनोखा प्रयोग त्यांनी केला जो आजही अभ्यासाचा विषय आहे. भूमिकेत इतकं एकरूम होऊन काम करता करता एक वेळ अशी आली होती कि त्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली. चित्रपटांतील व्यक्तिरेखा साकारताना त्यांत ते इतके अडकून जात कि त्याचा असर त्यांच्या मनावर होऊ लागला. मग ट्रॅजिक एन्ड असलेले सिनेमा काही काळ करू नयेत या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी पुढच्या वर्षी (१९५५) तब्बल तीन चित्रपट वेगळ्या ढंगाचे केले ते होते उडन खटोला, आझाद आणि इंसानियत. पण पुढच्याच वर्षी देवदास चित्रपटांतून ती सगळी ट्रॅजेडीची भरपाई त्यांनी भरून काढली.
कोहिनुर चित्रपटांतील 'मधुबन में राधिका नाचे रे '.. हे गाणं चित्रपटाच्या शेवटी चित्रित करायला सांगून त्या काळांत ते सतार शिकले आणि जेवढ्या नजाकतीने ते पडद्यावर त्यांनी साकारलंय ते पाहून थक्क व्हायला होतं.
असं म्हणतात 'मुगल ए आझम' चित्रपटाचं शूटिंग सुरु असतांना 'ये क्या मुगल शेहेजादा लगेगा, लग हि नहीं सकता', असे टोमणे सुद्धा त्यांनी सहन केले पण चित्रपट रिलीज झाल्यावर "अगर सलीम होता तो बिलकुल ऐसा हि दिखता", हि तारीफ सुद्धा मिळवली. आजवरच्या सर्व चित्रपटांतील सर्वात सुंदर रोमँटिक सीन कोणता यावर जेव्हा अभ्यास झाला तेव्हा त्यात याच चित्रपटांतील मधुबाला आणि दिलीपकुमार यांच्यावर चित्रित झालेला सीन ( ज्यात दिलीपकुमार मधुबाला च्या चेहऱ्यावर एक पीस फिरवतात) हा पहिल्या क्रमांकावर आला !
या चित्रपटांत अनेक गोष्टींकरता दिलीपकुमार यांच कौतुक झालं त्यात एक खास गोष्ट होती त्यांच्या संवादफेक आणि आवाजाची; विशेष करून शेहेजादा म्हणून बादशाहशी बोलताना. म्हणजे मनांत राग आहे पण तो व्यक्त करतांना वडिलांचा मान सुद्धा ठेवायचा आहे आणि राग व्यक्त करतांना कोठेही त्यांचा अपमान झालाय असंही वाटता कामा नाही .. हे बॅलन्स करणं खूप अवघड होतं जेव्हा समोर होते पृथ्वीराजकपूर. पण त्यांनी बखुबी निभावलं. असं म्हणतात त्यांच्या नंतर जर कोणी हि खुबी नेमकी निभावली असेल तर ती अमिताभ बच्चन यांनी, शक्ती सिनेमांत जेव्हा वडिलांच्या भूमिकेत होते खुद्द दिलीपकुमार !
एक फळांचा व्यवसाय करणारा 'युसूफ़' ते 'दिलीपकुमार' हा त्यांचा प्रवास तसा खूपच इंटरेस्टिंग आहे, त्याबद्दल उद्या ....
No comments:
Post a Comment