#11# गाईड
सत्यजित रे यांनी प्यासा चित्रपटांतील वहिदाजींच काम पाहून त्यांना 'अभिजान' (१९६२) या चित्रपटांत घेतलं. या चित्रपटामुळे वहिदाजींना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली.
त्या वेळी सत्यजित रे वहिदाजींना म्हणाले होते कि आर के नारायण यांच्या गाईड या कादंबरीवरून त्यांना एक चित्रपट बनवायचा आहे आणि त्यातल्या रोझी या पात्रासाठी त्यांना वहिदाजीच हव्या आहेत.
पुढे देवानंद यांनी याच कादंबरीवर आधारीत चित्रपटासाठी रोझीच्या भूमिकेकरता वहिदाजींना विचारलं. वहिदाजींना तेव्हा प्रश्न पडला हा चित्रपट तर सत्यजित रे बनवणार होते. मग देवानंद यांनी सांगितलं कि या चित्रपटासाठी त्यांनी त्या पुस्तकाचे सर्व हक्क विकत घेतले आहेत आणि आता तेच हा चित्रपट बनवणार आहेत. देवानंद आणि वहिदाजींचा हाच तो गाजलेला चित्रपट 'गाईड'(१९६५).
या चित्रपटाकरता नृत्य दिग्दर्शक होते सोहनलाल. दिवसभर शूटिंग आणि रात्री यातील नृत्याची प्रॅक्टिस यामुळे वहिदाजी खूप थकून जात. पण या मेहनतीच फळं त्यांना मिळालं. या चित्रपटातील एक से बढकर एक गाण्यांची आणि त्यातील वहिदाजींच्या नृत्याची खूप तारीफ झाली.
लम्हे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान यश चोप्रा साहेबांनी एका नृत्याकरता श्रीदेवीला गाईड मधील वहिदाजींचे नृत्य, त्यातील त्यांची खास अदा पाहायला सांगितली होती कारण त्यांना जे अपेक्षित होतं त्याकरता त्यांच्या समोर फक्त वहिदाजी येत होत्या.
असं म्हणतात कोणाच्याही फिल्म करियर बद्दल बोलताना काही चित्रपट त्या कलाकाराच्या नावाशी जोडलेले आहेत हे आवर्जून लक्षांत येतं. जसं नर्गिस आणि मदर इंडिया, मीनाकुमारी आणि साहेब बीबी और गुलाम , मधुबाला आणि मुगले आझम तसंच वहिदाजी आणि गाईड .....
No comments:
Post a Comment