Thursday, July 9, 2020

#१२# साहेब बीबी और गुलाम 

हा चित्रपट गुरुदत्त जेव्हा बनवत होते तेव्हा वहिदा रेहमान यांनी छोटी बहू च्या रोल करता गुरुदत्त यांना सांगितलं कि त्यांना तो रोल करायचा आहे. गुरुदत्त यांनी समजावलं," ये मुश्किल है , आप इतनी mature नही हो  कि ये किरदार निभा सको '.. कारण त्या भूमिकेत छोटी बहूच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते. पण आपण अन्याय करत नाहीये हे समजावण्यासाठी गुरुदत्त यांनी वहिदाजींना त्यांतील एक सिन करायला सांगितला आणि ते म्हणाले, ' तुम्हे मै फेअर चान्स देता हूँ  ताकी तुम भी समझ सको मै क्या बोल रहा हूँ , ये तुम्हारी स्क्रीन टेस्ट है। ' मग काय वहिदाजींनी तो सीन केला. 

चित्रित झालेला तो सीन पाहून वहिदाजींनी प्रामाणिक पणे कबुल केलं कि हा रोल मी नाही करू शकत आणि मिनाजीच या करता योग्य आहेत... 

खरंच , काय सच्चाई होती या लोकांची आपल्या कामाकरता !! कमाल ....

No comments:

Post a Comment