#14# नूतन (२)
'सीमा' या चित्रपटातील कामाकरता नूतन यांना पहिलं बेस्ट एक्टरेस अवॉर्ड मिळालं आणि तिथूनच सुरु झाला एक से बढकर एक सिनेमांचा सिलसिला... पेइंग गेस्ट, अनाडी , दिल्ली का ठग आणि मग आला तो माईल स्टोन बिमल रॉय यांचा 'सुजाता'. यांतील भूमिकेसाठी त्यांना परत मिळालं बेस्ट एक्टरेस अवॉर्ड !
वयाच्या तेविसाव्या वर्षी रजनीश बेहेल या नेव्ही ऑफिसरशी लग्न करून त्यांनी सिनेमातलं काम थांबवलं. त्यानंतर काही दिवसांनी बिमल रॉय त्यांच्याकडे एक स्क्रिप्ट घेऊन गेले त्यावर नूतन यांनी त्यांना सांगितलं कि त्या आता चित्रपटांत काम करणार नाहीत. त्यावर बिमलदा म्हणाले, 'जर तू काम केलं तरच हा चित्रपट मी करेन कारण हा रोल फक्त आणि फक्त तूच करावा हि माझी इच्छा आहे'. अस सांगून ते स्क्रिप्ट ते तिथेच ठेवून गेले. रात्री ते स्क्रिप्ट रजनीशजींनी वाचलं, त्यांना ते खूप आवडलं आणि म्हणूनच ते काम करण्यासाठी त्यांनी नूतन यांच मन वळवलं. त्यांनी नूतन यांना सांगितलं 'हे काम जर तू केलं नाहीस तर त्या भूमिकेवर, त्या चित्रपटावर आणि स्वतःवर अन्याय करशील'. अखेर ही संधी न सोडता त्यांनी परत चित्रपटांत काम करायचं ठरवलं.
शूटिंग सुरु झालं आणि समजलं नुतन गरोदर आहेत म्हणून. मग काय बिमलदा म्हणाले," Take your own time, ये सिनेमा बनेगा अगर आप काम करेंगी वरना नही बनेगा." आणि ते चक्क दोन वर्ष थांबले, नूतनजींसाठी. १९६१ मध्ये सुरु झालेलं काम १९६३ साली पूर्ण झालं आणि आपल्याला मिळाला एक अप्रतिम चित्रपट बंदिनी !
No comments:
Post a Comment