Thursday, July 9, 2020

#1# मोगरा फुलला या गाण्याची एक आठवण..

या गाण्याचं रेकॉर्डिंग जेव्हा झालं तेव्हा पहिल्यांदा या गाण्यात तबला, तंबोरा, बासरी, सरोद, वीणा अशी अनेक वाद्य होती. ज्ञानेश्वरांचे शब्द आणि दिदींचा आवाज.. 
गाणं रेकॉर्ड झालं. त्या वेळी वर्षा भोसले म्हणजे आशाताईंची मुलगी दिदीं बरोबर रेकॉर्डिंग करता आली होती. ती दिदींना म्हणाली "मावशी, तू घरी म्हणतेस ते जास्त छान असतं, हे तसं नव्हतं"...
दिदींना समजेना की ती का असं म्हणते आहे. ती वयाने खूप लहान होती पण तिचं म्हणणं कुठेतरी त्यांना अस्वस्थ करून गेलं. संगीतकार हृदयनाथजी आणि त्यांनी त्यावर विचार केला आणि काय कारण असावं की वर्षा असं म्हणाली. ती जरी लहान होती तरी घरी होणारा सर्वांचा रियाज कानी पडून तिचे कान मात्र तयार होतं होते याची त्यांना कल्पना होती. मग एकदम दिदींच्या लक्षात आलं की काय कारण असू शकतं. त्यांनी तबला, तंबोरा, बासरी सोडून बाकीची सर्व वाद्य वाजवणाऱ्या सर्वांना थोडं बाहेर थांबायची विनंती केली आणि गाणं रेकॉर्ड केलं. मग जे गाणं रेकॉर्ड झालं ते वर्षाच्या मते घरी जितकं गोड, छान, शांत वाटतं होत अगदी तसंच झालं होतं.... तेच गाणं आपण इतकी वर्ष ऐकत आलो आहोत ... 

No comments:

Post a Comment