#24# रफी़ साहेब आणि नौशादजी
रफी साहेब अब्दुल हमीद यांच्या बरोबर मुंबईत येऊन भेंडी बाजार येथे छोटीशी खोली घेऊन राहू लागले.
'शहाजहान' चित्रपटाच्या गाण्यांचे रेकोर्डिंग चालू होते. रफीसाहेबांना त्यात कोरस मध्ये गाण्याची संधी मिळाली. काही कारणाने एके दिवशी रेकॉर्डिंग रहीत झाले. सगळे जण आपआपल्या घरी निघाले. संगीतकार नौशाद यांनी पाहिले एक मुलगा खाली पायरीवर बसून आहे. नौशादजींनी घरी कां नाही गेलास असे विचारले असता तो म्हणाला माझ्याकडे परत जायला पैसे नाहीत. एक रुपया होता तो येताना खर्च झाला. रेकॉर्डिंग झाले असते तर पैसे मिळाले असते. नौशादजींनी त्याला १ रुपया देऊ केला पण तो मानी मुलगा म्हणाला जर मी कामच नाही केले तर मी हे पैसे कसे घेऊ ? पण नौशाद साहेबांनी त्याला समजावून तो रुपया जबरदस्तीने दिला व घरी जायला सांगितले. त्यानंतर मध्ये बराच काळ लोटला. रफीजी गायक म्हणून नावारुपाला आले.
एक दिवस नौशादजी रफीजींच्या घरी आले असता त्यांना भिंतीवर एक रुपयाचे नाणे फ्रेम मधे चिकटवलेले दिसले. नौशादजींनी त्याबद्दल विचारले असता रफीजींनी ती जुनी आठवण सांगितली व ते म्हणाले, 'तुम्हाला आठवतो ना तो मुलगा ज्याच्याकडे भाड्यासाठी रुपया पण नव्हता. तेव्हा तुम्ही ज्याला मदत केलीत तो मीच! मला त्या कठीण दिवसांचा विसर पडू नये म्हणून मी त्या दिवशी चालत आलो आणि ते नाणे जपून ठेवले. जेव्हा चार पैसे हातात येतील तेव्हा सुद्धा तुमच्या सारख्या सह्रदय माणसाची कायम स्वरुपी आठवण रहावी म्हणून मी ती फ्रेम करुन लावलेआहे' !
No comments:
Post a Comment