Thursday, July 30, 2020

#४३# तुम इतना जो मुस्कुरा रहे हो .... 

शबानाच्या जन्मानंतर कैफी आजमी यांच्या पत्नी शौकत आजमी यांनी पृथ्वी थिएटरमध्ये अभिनयाची नोकरी केली. पृथ्वीराज कपूर यांनी रिहर्सलच्या वेळी शबानाच्या देखरेखीसाठी एका आयाची व्यवस्था केली. एकदा शौकत पृथ्वी थिएटरसोबत टूरवर जात होत्या आणि त्यांनी कैफी साहेबांना काही पैशांच्या बंदोबस्ताची विनंती केली. रेल्वे चालू झाल्यावर कैफी साहेबांनी त्यांच्या हातावर तीस रुपये ठेवले जी त्या काळात मोठी रक्कम होती. शौकत आश्चर्यचकित झाल्या कि एवढे पैसे त्यांनी कुठून आणले. टूरवरून परतल्यानंतर त्यांना कळाले की, कैफींनी पृथ्वीराज कपूर यांच्याकडून शौकतच्या पगाराची आधीच उचल केली होती. कैफींनी पैसे कोठून आणले हे सांगताच शौकतजींच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं. मात्र त्याच वेळी दोघांचे डोळे निमिषार्धासाठी पाणावले. त्या वेळी ते दोघेही आर्थिक अडचणी हसत खेळत झेलत होतेच पण आपल्या पत्नीचेच पैसे उचल घेऊन तिलाच हातखर्चासाठी द्यावे लागले हे सांगतांना कैफ़ी साहेबांना अगतिकता काय आहे हे जाणवलं. 
खरं काय हे सांगितल्यावर पत्नीच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू आणि काळजातलं दुःख जे तिच्या डोळ्यांच्या कडा भिजवून गेलं ते विसरू शकले नाहीत. ती बोच, सल मनांत खोलवर रुतून बसली. दुसऱ्या दिवशी कैफीं आजमींनी आपल्या प्रिय पत्नीच्या भावना शब्दबद्ध करत एक नज़्म लिहिली, जी पुढे आपली मुलगी शबाना काम करत असलेल्या 'अर्थ' चित्रपटांत त्यांनी वापरली .....  

'तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो...'

No comments:

Post a Comment