#4# पाकीज़ा
मीनाकुमारी आणि कमाल अमरोही या दोघांनी एकत्र बघितलेल सुंदर स्वप्न म्हणजे चित्रपट *पाकिजा*! पाकीज़ा चा मुहुर्त खरं तर १९५६ साली झालेला. परंतु पुढे काही कारणास्तव शूटिंग थांबलं. नर्गिस, सुनिल दत्त, खय्यामजी आणि त्यांची पत्नी जगजित कौर यांच्या मध्यस्थीमुळे ९ वर्षांनी मीनाजींनी पाकिजा साठी पुन्हा काम सुरु केले.पण आता अशोक कुमार प्रौढ दिसू लागले होते. मीनाजींच पण वय वाढलेलं. आजाराने शरीर थकलेलं. पण या सर्वावर मात करुन, शक्य तिथे विशेषतः नृत्यात डुप्लीकेट (पद्मा खन्ना) वापरुन शूटिंग लवकरात लवकर पूर्ण केले. फेब्रुवारी '१९७२ ला "मराठा मंदीर" येथे पहिला शो होता. त्यानंतर मीनाजींची तब्येत ढासळतचं गेली. एलिझाबेथ नर्सिंग होम मध्ये त्यांना दाखल केले.एवढ्या कष्टाने पूर्ण केलेला चित्रपट म्हणावा तेवढा चालला नाही. मात्र ३१ मार्च १९७२ रोजी मीनाजींच्या निधनानंतर चित्रपट "न भूतो न भविष्यती" असा चालला.
मीनाजी उत्तम शायरी करत. कथाही लिहीत.फार थोड्या लोकांना माहित असेल कि मीनाजींची आजी हेमसुंदरी ठाकूर(टागोर) ही रविंद्रनाथ टागोरांच्या धाकट्या भावाची मुलगी. कदाचित साहित्य आणि काव्याची जाण ही त्यांना आजोळाकडून आली असावी. *नाज* ह्या नावाने असलेलं सर्व साहित्य मीनाजींनी जाताना गुलजारजींच्या स्वाधीन केलं होतं आणि गुलजारजींनी ते प्रसिध्दही केलं. त्यातल्या मला आवडलेल्या *चांद तनहा*...या कवितेच्या चार ओळी..
चाँद तनहा है आसमां तनहा
दिल मिला है कहां कहां तनहा
छोड जायेंगे सदियों तक
याद करेगा ये जहाँ तनहा...
No comments:
Post a Comment