Thursday, July 9, 2020

#7# किशोरकुमार आणि रफीसाहेब

'आराधना' चित्रपटातील एक से बढकर एक गाण्यांनंतर किशोरदा  इतके व्यस्त झाले की प्रत्येक डायरेक्टरला मग त्यांच्याकडूनच गाणी हवी असायची. त्याआधी एक वेळ अशी होती कि हिंदी चित्रपट सृष्टीतील 80 ते 90% गाणी रफी साहेबांकडे असायची व बाकीची गाणी इतर गायकांकडे .. हे चित्र अचानक पालटलं आणि ती 80 ते 90 % गाणी आता किशोरदांना मिळू लागली. 

त्याच सुमारास एका प्रसिद्ध मासिकाने Letter to Editor या कॉलम मध्ये किशोरदा आणि रफी साहेबांमध्ये कोण श्रेष्ठ यावर त्यांच्या चाहत्यांना त्यांची मतं पत्राने  पाठवायला सांगितली, मग काय  चक्क पत्रांचा पाऊस पडला. पण हा प्रकार जेव्हा किशोरकुमार यांना समजला तेव्हा ते खूप अस्वस्थ झाले. त्यांनी स्वतः एक भलं मोठ पत्र पाठवून ताबडतोब ते सगळं बंद करायला सांगितलं.  त्यांच ते पत्र प्रसिद्ध केलं गेलं. ते पत्र त्यांनी दोघांच्या चाहत्यांकरता लिहिलं होतं. " इस बेहेज को यही पर खतम कर दिजीए। मेरे लिए ये शर्म की बात है । ये सोचना के हम दोनो में कौन बडा सिंगर है ये बिलकुल गलत है। मै खुद उनका बहोत बहोत बडा फॅन हूँ। उन्होने कितने बढिया गीत गाये है , बताईये क्या मै उनके जैसा गा सकता हूँ कभी ?" आणि सोबत रफी साहेबांनी गायलेल्या काही  निवडक  गाण्यांची यादी जोडली होती. त्यातील एक गाणं होतं, "मधुबन में राधिका नाचे रे..."



खरंच , कमाल होती ही पिढी ... 

No comments:

Post a Comment