#३५# साहिर (३)
सचिन देव ऊर्फ एस.डी.बर्मन दूर गेल्यानंतर साहिर आणि ओ.पी. नय्यर ही जोडी जमली. या जोडीने ‘नया दौर’, ‘तुमसा नही देखा’ असे अनेक चित्रपट केले.१९५७ मध्ये दिलीप कुमार, वैजयंती माला यांच्यावर चित्रित झालेल्या 'माँग के साथ तुम्हारा मैने माँग लिया संसार'….. या गीतातील शब्दांनी तरुणाईला भारून टाकलं.संगीतकार खय्याम यांच्यासोबत साहिर यांनी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर गीते दिली. 'कभी कभी' चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले ‘मै पल दो पल का शायर’.. या शब्दांनी अनेकांना हेलावून सोडलं.
हम दोनो चित्रपटातील ‘अल्लाह तेरो नाम…’, ‘कभी खुद पे कभी हालात पे…’ तसंच, ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया‘.. सगळीच सुपरहिट गाणी. 'अभी ना जाओ छोड कर…’ यातील आर्तता शब्दांत पकडणे फक्त साहिरनाच शक्य होते.
साहिर यांचे चित्रलेखा चित्रपटातील, संगीतकार रोशन यांनी ‘यमन’ रागात बसविलेल्या आणि मोहम्मद रफी यांनी गायकीने एका वेगळ्याच उंचीवर नेलेलं गीत म्हणजे ‘मन रे तू काहे ना धीर धरे’ ..अतिशय गाजलं.
आर. डी. बर्मन यांच्यासाठीही साहिर यांनी गीतलेखन केले. 'आ गले लग जा' मधील त्यांच्या ‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई…’ तील शब्दांनी अनेकांना भुरळ घातली तर जोशिला मधील ‘किसका रस्ता देखें ऐ दिल ऐ सौदाई' या शब्दांनी वेड लावलं..
साहिर यांच त्यांच्या आईवर जीवापाड प्रेम होतं. लहानपणी ज्या परिस्थितीमधून ते गेले त्याची जखम त्यांच्या मनावर कायम ताजीच राहिली. ते कोणताही दौरा असला तरी आईला सोबत नेत. स्वतःला फकीर अस संबोधून ते आईला सांगत,' फकीर को ऐसा लगा तो उसने ये लिख दिया,' आणि आई जेव्हा त्याचं कौतुक करत असे, तेव्हाच त्यांना खरं समाधान मिळत असे. असं म्हणतात त्रिशूल चित्रपटातलं 'तू मेरे साथ रहेगा मुन्ने', हे गाणं म्हणजे त्यांनी आपल्याच आईच्या व्यक्त केलेल्या भावना आहेत.
१९६० मध्ये शायर कैफि आझमी यांनी साहिरबद्दल लिहिलं होतं, 'मै साहिर से पेहेली बार मिला था तो शायर थे, गालीबन आखिरी बार मिलूँगा उस वक्त़ भी शायर ही रहेंगे'.. त्यांच म्हणणं असं होतं की,'प्रोड्युसरी और डायरेक्टरी में इतनी ताकत कहा जो साहिर को समा सके'..
अगदी खरं.. 'औरत ने जनम दिया मर्दो को, मर्दो ने उसे बाजार दिया' किंवा ' दो कलियाँँ गुलशन की, एक सेहेरे के बीच बुंधी और मन ही मन इतराए, दुजी अर्थी भेट चढे और घुली में मिट जाए, किस को मुजरीम समझें कोई किसको दोष लगाए'.. या ओळींमधून साहिर समजू लागतो.
ताजमहाल प्रत्यक्ष न बघता 'ताजमहाल' ही नज्म़ लिहिणारा साहिर (असं म्हटलं जातं की यापेक्षा सुंदर वर्णन असूच शकत नाही ताजमहालचं) हे कसं शक्य आहे या कोड्यात टाकतो.
चलो एक बार फिरसे
अजनबी बन जाए हम दोनो
मैं तुमसे कोई उम्मीद रखूँ,
दिलनवाज़ी की
न तुम मेरी तरफ़ देखो
गलत अंदाज़ नज़रों से
न मेरे दिल की धड़कन
लड़खड़ाये मेरी बातों में
न ज़ाहिर हो तुम्हारी
कश्मकश का राज़ नज़रों से
चलो इक बार फिर से
अजनबी बन जाएं हम दोनों....
आपल्या तुटलेल्या नात्याबद्दल इतक्या सुरेख ओळीं लिहिणारा फक्त साहिरच असू शकतो !!!
No comments:
Post a Comment