Thursday, July 30, 2020

#४८# गीतकार योगेश

कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे..
उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे.. 

'बातों बातों में’ या चित्रपटामधील हे गीत, चाळीशी गाठूनही आजही आपल्या मनांत रुंजी घालणारं...

"कइ बार यूँ ही देखा है
ये जो मन की सीमा रेखा है
मन तोडने लगता है
अंजानी आस के पिछे"...
साध्या उत्कट शब्दांमधून व्यक्त होणारे गहन अर्थ हे त्यांच्या गाण्यांची खासियत.

रजनीगंधा फुल तुम्हारे, बडी सुनी सुनी है, जिंदगी कैसी है पहेली, कही दूर जब दिन ढल जाए, मैने कहा फुलो से अशी एक से एक बेहतरीन गाणी लिहिली योगेश यांनी. 'ते जणू मोरपीस घेऊन गीत लिहीतं', असं म्हटलं जायचं.

त्यांच्या 'रिमझिम गिरे सावन' या गाण्याची एक आठवण..

हे गीतकार योगेश यांनी लिहिलेलं एकचं गीत किशोर कुमार व लता मंगेशकर यांच्या आवाजात वेगवेगळ रेकॉर्ड होणार होते. किशोर कुमार यांच्या आवाजात ते गाणं रेकॉर्ड झालं आणि मग लताजींना बोलावण्यात आलं.जेव्हा त्या रेकॉर्डिंग स्टुडियोमध्ये आल्या तेव्हा त्यांनी या गाण्याचे शब्द ऐकून ते न आवडल्याने गाणे पुन्हा लिहायला गीतकार योगेश यांना सांगितले.त्यांच्यापेक्षा खूप ज्युनिअर असलेल्या गीतकार योगेश यांना हे अनपेक्षित होतं.. पण तरीही त्यांनी लगेच समोरच असलेल्या एका हॉटेलात जाऊन थोड्या वेळात आधीच्याच 'रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन, भिगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन', या मुखड्यावर वेगळे अंतरा म्हणजे कड्व्यांसाठी नवे शब्द लिहून आणले. ते लताजींना आवडले आणि लगेच या गाण्याचे रेकॉर्डिंग पार पडले.. दोन्ही गाण्यांचे शब्द अप्रतिम तर आहेतच आणि दोघांनी ते गायलंय सुद्धा अतिशय दैवी आवाजात...  

चला तर मग आज नक्की ऐका एकच मुखडा असलेली ही दोन्ही अप्रतिम गाणी, गीतकार योगेश यांच्यासाठी .....

No comments:

Post a Comment