गुलाबी रंग .. प्रेमाचं, कोमल जाणिवांचं, स्नेहाचं, शांततेचं, तारुण्याचं,आनंदाचं, स्त्रीत्वाचं आणि स्वप्नांचं प्रतिक !
पावसाळा संपतो आणि थंडीची चाहूल लागते. धुक्याची शुभ्र चादर पसरता वाटतं पहाटे पहाटे थंडीचा गुलाबी शेला लपेटून घ्यावा..
'ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा
हाय श्वासांतही ऐकू ये मारवा'..
आयुष्याच्या एका वळणावर गुलाबी रंगांचं खास आकर्षण असतं.. वाटतं या रंगात रंगून जाण्यासारखं सुख नाही. वास्तवाचं भान हरपून आयुष्याची स्वप्न रंगवण्यात हरवलेलं गुलाबी मन!
मला आठवतंय साधारण चौदा ते अठरा या वयामध्ये प्रत्येकाच्या आवडत्या गाण्यांच्या यादी मध्ये 'ए मेरे हमसफर, अकेले है तो क्या गम है, पेहेला नशा पेहेला खुमार, दिल है के मानता नहीं, हमने घर छोडा है, मेरे रंग में रंगने वाली परी हो या तुम, केहे दो के तुम हो मेरी वरना' आणि आशिकी मधली एक से एक गाणी होती. टेपरेकॉर्डर वर गाणी ऐकून ऐकून ती कॅसेट खराब व्हायची पण गाणी ऐकायची हौस काही फिटायची नाही. आजही ती गाणी ऐकतांना तेवढीच फ्रेश वाटतात, रोमँटिक वाटतात, पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात आणि गंमत म्हणजे हि गाणी परत एकदा आपल्याला तिथेच मागे घेऊन जातात. ज्या गाण्यांमध्ये कधी आपण स्वतःलाच पाहिलं होतं, कधी त्या आवाजात रमताना त्या शब्दांमध्ये मनातील पुसटसे भाव शोधले होते तर कधी प्रेमात न पडताही प्रेमात पडल्याची अनुभूती याच गाण्यांनी तर दिली होती.. या हर एक गाण्याशी जोडलेली प्रत्येकाची एक खास गोष्ट होती.
'ऐ मेरे हमसफ़र, एक ज़रा इन्तज़ार,
सुन सदाएँ दे रही है, मंज़िल प्यार की'....
गाण्याची पहिलीच ओळ ओठांवर रेंगाळणारी. हे गाणं पाहतांना, ऐकतांना या गाण्याने प्रत्येकाला एक स्वप्न दाखवलं आणि प्रेमात पडणं खरंच किती गोड असतं असं वाटू लागलं..
'उसने बात की, कुछ ऐसे ढंग से, सपने दे गया वो हज़ारों रंग के, रेहे जाऊँ जैसे में हार के, और चूमे वो मुझे प्यार से.. पेहेला नशा, पेहेला खुमार'... जो जिता वही सिकंदर मधलं एक कमाल गाणं ! हे ऐकतांना, 'अनजाना अनदेखा आने लगा खयालों में ', असं काहीसं व्हायचं. स्क्रीन वर स्वतःला imagine करून, स्वेटर उडवून स्लो मोशन मध्ये गाणं म्हणणारा आमिर बघून सर्वाचा विसर पडायचा.. त्या गुलाबी रंगात मनसोक्त रंगून जावं असं वाटायचं.
'हम तो मोहब्बत, करते हैं तुमसे,
हमको है बस इतनी खबर,
तन्हाँ हमारा, मुश्क़िल था जीना,
तुम जो न मिलते अगर..
बेताब साँसें, बेचैन आँखें,
केहेने लगीं, बस यहीं,
दिल है कि मानता नहीं..
या गाण्यात लपलेली गुलाबी जादू आजूबाजूचं जग विसरायला लावायची.
'अकेले हैं, तो क्या ग़म है, चाहें तो हमारे बस में क्या नहीं, बस इक ज़रा, साथ हो तेरा,तेरे तो हैं हम,कब से सनम, अकेले हैं'... और क्या चाहिये !
गुलाबी रंगामुळे आज परत एकदा या गाण्यांची आठवण झाली, वाटलं खरंच किती वेडे होतो आपण.आज काही क्षणांसाठी का होईना पण त्या आठवणी परत एकदा स्पर्शून गेल्या. या गाण्यांनी आपलं बोट धरून एक वेगळंच जग दाखवलं आपल्याला, काही वेळाकरता का होईना जगाचा विसरही पडला. आजही काळाच्या वेगात धावता धावता अधून मधून तो वेडेपणा आठवला कि हसायला येतं. आयुष्यातील इतक्या हळुवार टप्प्यावर ज्या गुलाबी गाण्यांनी साथ दिली ती गाणी आजही आपल्या सर्वांसाठी खास आहेत आणि कायमच राहतील.
©कविता सहस्रबुद्धे
No comments:
Post a Comment