रंग - नवरात्र
रंग म्हटलं की रंगांच्या कितीतरी छटा नजरेसमोरून धावतात मग ते सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळचे आकाशातील रंग असोत निसर्गातील किमया असो वा कॅनव्हासवरची जादू .. अगदी आपल्या कपड्यांपासून जेवणाच्या ताटात सुद्धा सामावलेली असते ही रंगांची दुनिया !
नवरात्री मध्ये तर प्रत्येक दिवस वेगवेगळ्या रंगामध्ये रंगून जातो. आजचा पहिला रंग, पांढरा !
श्रावणात सोमवारी शंकराच्या देवळांत जातांना परडीमध्ये आवर्जून गोळा केलेली फुलं पांढरी, बाप्पाला आवडतात म्हणून केलेले सुबक, देखणे मोदकही पांढरे ! चांदण्या रात्रीला गंधित करणारी रातराणी व गर्मीमध्ये सुखावणारा मोगरा तो ही शुभ्रच.
आयुष्यात सदैव सोबत असणारे हे रंग काही वळणांवर मात्र त्यांची ओळख नव्याने करून देतात.
"इश्क का रंग सफेद .. जिस रंग में सब रंग जावे कभी करे ना भेद, इश्क का रंग सफेद".. रेखा भारद्वाज यांच्या आवाजातील हे गाणं ऐकलं की वाटतं या गाण्यात दिसलेला, अनुभवलेला 'सफेद रंग' खरंच 'इश्क का रंग' आहे !
"मै शाम को तुम्हे मिलना चाहता हूँ .. लेकीन मेरी चांँदनी बनकर आना, सफेद दुधीया रंग के कपडे पेहेनकर आना" ..
हा डायलॉग संपतो आणि दिसते गच्चीवर वाट बघणारी, शुभ्र कपड्यातली चांँदनी.. तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाल्यावर त्या लाल गडद पाकळ्यांवर उभी असलेली 'चांँदनी', आजही डोळे मिटले तरी तशीच समोर येते !
'जय तिजोरी में काफी माल है, लगता है इस गाव के लोग सोना बहोत पेहेनते है'.. या डायलॉग च्या पार्श्वभूमीवर दिसणारी पांढऱ्या साडीतील स्त्री .. नंतरच्या प्रसंगात चोरी करणाऱ्या जय वीरुला तिजोरीच्या किल्ता देतांना, 'ये लो तिजोरी की चाबी। इसमे मेरे वो गेहेने है जो मेरे लिए बेकार है, मुझे अब कभी उनकी जरुरत नहीं पडेगी'.. असं म्हणणारी, डोक्यावरून पदर घेतलेली, पांढऱ्या साडीतील ठाकूरची बहू .. तिच्या पेहेरावातला पांढरा रंग फार वेगळा आहे, करूण आहे ..
15 ऑगस्ट, 26 जानेवारीला हाच रंग चैतन्य, उत्साह आणि अभिमानाच रूप घेतो. तिरंग्यातील हा रंग प्रेरणा देतो !
'हॉस्पिटलच्या खिडकीतून मला देवळाचा कळस रोज दिसायचा पण 'तो' मात्र मला इथे भेटायचा हॉस्पिटलमध्ये' .. असं म्हणणाऱ्या पेशंट करता या रंगांचं महत्व, दैवी आहे !
गरमियों की रात जो पुरवाईयाँ चलें
ठंडी सफ़ेद चादरों पे जागें देर तक
तारों को देखते रहें छत पर पड़े हुए
दिल ढूँढता है
फिर वही फ़ुरसत के रात दिन...
गुलजार .. ज्यांच्या लेखनात कितीतरी अनोखे, वेड लावणारे, जादुई रंग सामावले आहेत ते गुलजार साहेब स्वतः मात्र कायम पांढरे शुभ्र कपडे घालतात.. त्यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल वाचलं की वाटतं त्या शांत, समाधानी शुभ्र पेहेरावामागे त्यांनी आपला भूतकाळ सांभाळून ठेवला आहे .. 'जैसे लगता है गुलज़ार कभी अपने माज़ी के गाँव दीना की गलियों से बाहर आए ही नहीं'..
© कविता सहस्रबुद्धे
No comments:
Post a Comment