Thursday, April 28, 2022

 

वाणिज्य शाखेतील पदवी मिळवलेल्या मला सखोल तांत्रिक ज्ञान नसल्याची खंत अधूनमधून डोकावत असते. दर वर्षी, ऍडमिशन सोहळा सुरु झाला कि माझ्या सोबत मुलाखतीच्या पॅनल वर कायम Technically strong expert असतो, to balance असं म्हणू शकतो हवं तर. मग त्याने aspirants ला विचारलेले प्रश्न मी मनातल्या मनात स्वतःला विचारात असते. दर वर्षी स्वतःची अशी एक परीक्षा कळत नकळत parallel mode वर चालू असते माझी. score काय होतो हा वेगळा विषय आहे, ते हि विचार करायला लावणारा.. 
तर आज जेवतांना काय झालं, एका पॅनल वर आलेल्या इंडस्ट्री मधील एका सिनियर एक्स्पर्टचं मनापासून कौतुक माझा एक प्राध्यापक सहकारी करत होता. जसं वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांच ज्ञान, अनुभव कितीतरी दांडगा आहे, केवढी चौफेर माहिती आहे त्यांना वगैरे वगैरे.. जे अगदी खरं आहे आणि जे मी पण अनुभवलंय, बरेचदा त्यांच्याशी बोलतांना. अगदी थक्क व्हायला होईल इतकं व्यापक ज्ञान आहे त्यांच्याकडे. कोणत्याही विषयावर ते अभ्यासपूर्ण बोलू शकतात. तर झालं असं, त्यांची तारीफ करतांना त्याने एक इंग्रजी वाक्य वापरलं, 'his knowledge spectrum is very very wide'...हे शब्द ऐकतांना मी विचार केला 'असं माझ्याबद्दल कोणी कधीच म्हणू नाही शकणार यार'.. आणि नकळत माझ्या तोंडून एक वाक्य बाहेर पडलं, एकदम उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती ती माझी, ' my knowledge spectrum is too limited, but it's too deep ha' .. याची प्रचिती अनेकदा अनुभवलेला माझा सहकारी या वाक्यावर खळखळून हसला व म्हणाला 'या वाक्याचं पेटंट करून ठेव'... 
एकूण काय तर कधीकधी इंग्रजी भाषेतून पण समजतं आपला knowledge spectrum काय आहे ते !

No comments:

Post a Comment