Tuesday, April 19, 2022

 

वाळवंटात हरवले 
तरी जगण्याची जिद्द उरात आहे  
डाव जुना मांडलेला अजूनही बाकी आहे ... 

अर्ध्या वाटेत सुटले हात 
सावल्या तेवढ्या सोबत आहेत 
कितीही नाही म्हटलं तरी सल बोचरी मनी आहे .. 

आपलं कोण, परकं कोण उत्तरंही तीच आहेत 
वाळवंटात असले म्हणून काय झालं
डोळ्यात अजूनही पाणी आहे !

No comments:

Post a Comment