Tuesday, April 12, 2022

मोबाईल मधले वेगवेगळे App वापरतांना फार मजा येते, असंच एक आहे true caller. आता तुम्ही म्हणाल त्यांत काय एवढं .. पण गंमत काय आहे सांगू का , ऍडमिशनच्या काळांत इतके फोन येतात तेव्हा एकदम भारी वाटतं , कोण बोलतंय ते आधीच कळतं शिवाय कुठून बोलतंय ते पण समजतं.  जसं अरुणिमा बासु Kolkata India .. काही वर्षांनी चेहरा पण दिसला तर अजूनच भारी वाटेल. कोण कुठून बोलतंय आणि कसं दिसतंय एकदम सगळी कुंडली समोर येईल. सध्या नवीन पोट्टे कुठून कुठून येणार त्याची झलक मला अशी आधीच मिळते आहे. 

झालं काय मागचा महिना इतका गोंधळ होता कि निवांत श्वास घ्यायला पण उसंत नव्हती. ऑफिस मध्ये नेहमी सारखं काही तरी पेटलेलं असतंच शिवाय मी आठवडाभर सुट्टी वर .. त्याच वेळी पुस्तकाचं काम पण सुरु होतं आणि जोडीला सतत बडबडणारी दहावीची गॅंग होती. बरं कसं होतं माहिती आहे का , नातेवाईकांचे १०० मेसेज बुडले तरी चालेल पण इथला एक पण बुडवायचा नाही असं आपलं तत्व त्यामुळे ऑनलाईन अपडेट ठेवता ठेवता आणि सोबत बोलता बोलता दमायला होतं कधी कधी.  
बरं सांगत काय होते तर हां .. या सगळ्या गोंधळात योगायोग पहा कसा असतो, एकच फोन सतत मिस होत होता, धनराज CALLING . बरं असं नाव कोणाचं असतं का सध्याच्या जगात त्यामुळे प्रश्न पडायचा कोण यार हा धनराज ? आणि मी मिस कॉल मध्ये हे नाव वाचलं ना कि मला 'कयामत से कयामत तक' मधला धनराज हे Character आठवायचं.  'मै तुमसे कुछ पूछ रहा हूँ राज , अगर ये मुलाकात अंजाने में हुई है तो मै माफ कर सकता हूँ'... 'आज के बाद तुम इस लडकी से कोई वास्ता नही रखोगे '..  'सरोज यही बात हम राज से सुनना चाहेंगे' .. 'अर्थी तो निकलेगी लेकिन एक नहीं दो'...   असे डायलॉग म्हणणारा हातात मोठी बंदूक घेतलेला दलीप ताहील आठवायचा. 

मग ठरवलं कॉल बॅक करावं आणि बोलावं, पाहावं कोण आहे हा धनराज. मग मी स्वतःशी थोडं धीरगंभीर आवाज काढून 'बोलो धनराज , क्या काम है' ? असं म्हणायची प्रॅक्टिस पण केली आणि लावला फोन. समोरुन कोणता आवाज येतोय हे काही सेकंदांच् वाट पाहणं म्हणजे त्या धनराज चा चेहरा रंगवून तो कसा असेल हे इमॅजिन करणं होतं. पण काय सांगू समोरून आलेला आवाज ऐकून मी चाट पडले. "अग इंदू तू आहेस ? खरंच का (इंदू, माझी वकील मैत्रीण )..  खरंच तूच आहेस का ? ohh my god .. मग हा धनराज कोण ? ohh म्हणजे तुझ्या प्रोफेशन मध्ये तुला असं करावं लागतं तर .. I see '...  म्हणजे कामासाठी मी तिच्या दुसऱ्यानंबर वर जर कधी फोन केला ना कि ती म्हणायची अगं मी केला होत फोन जो मला कधी समजायचाच नाही कि तिचा होता कारण missed कॉल मध्ये धनराज नाव यायचं ... ohh अच्छा असं होतं तर ... मी इतकं सगळं इमॅजिन करून माझं बोलून पूर्ण होईपर्यंत इंदूला प्रश्न पडला 'हि नक्की काय बोलते आहे आणि ते पण स्वतःशीच, मला चान्स देतच नाहीए'....... कारण तेव्हा तिला माहितच नव्हतं एका धनराज calling वरून मी किती मोठं चित्र रंगवलं होतं ते !

No comments:

Post a Comment