चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो.. ये रात ये चाँदनी फिर कहाँ सुन जा दिलकी दासता.... हम आपकी आँखों में इस दिलको बसा दे तो... जो बात तुझमें है तेरी तसवीर में नहीं... मै जिंदगी का साथ निभाता चला गया.. तुम आ गए हो नूर आ गया है ... जब भी ये दिल उदास होता है... बीती ना बिताई रैना .. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है .... तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मै.... ए ज़िंदगी गले लगा ले...
Play list मधली हि काही गाणी कितीही वेळा ऐकली तरी मन भरत नाही, अशी चिरतरुण आहेत. या गाण्यांवर आपण प्रेम करतो, आपल्या आधीच्या पिढीनं सुद्धा केलं कदाचित या गाण्यांतच जगली ती पिढी. पण पुढची पिढी करेल का या गाण्यांवर प्रेम असा प्रश्न मला नेहमीच पडतो.
दिवसभरात हि गाणी ऐकली नाहीत असं होत नाही. रोज ऑफिस ला जाताना, येताना बसमध्ये हिच गाणी तर सोबत असतात. सध्या मात्र मिळणारा मोकळा वेळ केवळ याच गाण्यांसाठी असतो. प्रत्येक गीतकाराची जादू वेगळी. हो, जादूच कारण इतकी वर्ष झाली तरी ओठांवर हीच गाणी आहेत. सलग तीस तीस चाळीस चाळीस वर्ष या क्षेत्रांत काम करून या लोकांनी जे काही अद्भुत करून ठेवलंय ना, तो खरंच खजिना आहे, आपल्यासाठी.
आपल्या आयुष्यात कधी सूर हरवला तर हाच सूर साथ देतो. 'गमों का दौर भी आये तो मुस्कुराके जियो', हि ऊर्जा देतो. 'जाने क्या मैने कहीं, जाने क्या तुने सुनी, बात तो बन हि गयी' सारखं चुटकीत मनातलं समोरच्या पर्यंत पोहचवायची खुबी सांगतो. भूतकाळाच्या आठवणी मनांत रुतल्या असतील तर चिंब सरींमध्ये ' जिंदगी भर नहीं भुलेगी वो बरसात कि रात ' हे गाणं आपल्यासाठी गातो आणि 'हाए जिस रात मेरे दिल ने धड़कना सीखा', या ओळीवर हृदयाची धडधड वाढवतो. ' किसी के मनाने में लज्जत वो पायी की फिर रूठ जाने को जी चाहता है ' म्हणत आपल्याला शायरी शिकवतो तर कधी आयुष्यात पडणाऱ्या प्रश्नांकडॆ पाहून ,' तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मै'... असं गुणगुणायला. कोणाची आठवण आली तर,' बीती हुई बतियाँ कोई दोहराये, भूले हुए नामों से कोई तो बुलाए,' या ओळींवर रेंगाळण सुद्धा शिकवतो.
हे सगळं लिहायचं कारण म्हणजे आज एक गोष्ट घडली... ' अजीब दासता है ये , कहाँ शुरू कहाँ ख़तम ' हे गाणं मी ऐकत होते. कांतेय बाजूलाच त्याच काही काम करत होता. गाणं संपलं आणि त्या निवेदकाने 'साहिर '.. असं म्हणताच मी pause करून कांतेय ला विचारलं कांतेय तुला साहिर कोण माहिती आहे ? तो एका क्षणांत म्हणाला,' साहिर लुधियानवी,एक मोठे LYRICIST'.. सुखद धक्का होता माझ्यासाठी. खरंच त्याच्या नावातील जादू ( साहिर म्हणजे जादूगार) आजही कायम आहे. पुढच्या गाण्याच्या आधी 'संपूर्ण सिंग कालेरा' असं त्या निवेदकाने म्हणताच मी फक्त कांतेयकडे पाहिलं आणि तो म्हणाला, 'आई गुलजार .. मला माहिती आहे ग '.. आणि गाण्याचा ओळी सुरु झाल्या , 'तुम आ गये हो , नूर आ गया है'... आज हि गाणी ऐकतांना मला अजूनच गोड वाटली !!!
No comments:
Post a Comment