शब्द सुद्धा पेलू शकत नाहीत मनातलं कधीकधी,
तेव्हा मूकपणे वाहून जातं सारं, पागोळीतील पाण्यासारखं ..
कौतुक करायला हक्काचे मायबाप नसतात ना तेव्हा,
सलत राहतं, गर्दीत मागे उरलेलं पोरकेपण, निष्पर्ण बाभळीसारखं ..
कितीही आव आणला, उसनं हसू गोळा केलं तरी
मुखवट्या मागचा चेहरा समोर येतो,आरशातल्या प्रतिबिंबासारखा..
कितीही उन्हाळे पावसाळे बघितले तरी आजही
उन्हाचा चटका तसाच भासतो, वैशाखातील वणव्यासारखा..
No comments:
Post a Comment