Tuesday, April 19, 2022


अस्वस्थतेचा तळ गाठता गाठता मन सैरभैर होतं 
शब्द.. स्वप्न.. हसू.. हरवता सारं काही धूसर होतं 
हातातून काहीतरी सुटतंय ... काय ते उमजत नाही  
भरून उरलेलं रितेपण उजाडलं तरी मिटत नाही 
जगण्याचं कॅनव्हास तरीही दूरुनच खुणावत असतं 
बहरलेलं प्राजक्ताच झाड अजूनही तिथेच असतं 
अंगण दिसत असलं तरी वाट मुळी सापडत नाही 
गाणं ओळखीचं वाटतं तरी शब्द काही आठवत नाहीत 
माझं माझं म्हणता म्हणता जग सारं अनोळखी होतं 
तळव्यावरच्या रेषांमधलं नेमकं सुख गायब होतं 
कितीही ओढलं तरी आडातलं पोहऱ्यात काही येत नाही   
दिस मावळतीला झुकला कि सोबत कुणी उरत नाही ... 

No comments:

Post a Comment