Friday, May 13, 2022


विस्तीर्ण मनाच्या काठी 
सुचते मजला चाल 
देखण्या निळ्या सांजेला
क्षितिजावर काहूर 
फाटते मौन शब्दांचे 
कवितेचा उमटतो सूर  
डोळ्यांमध्ये दाटे 
मृग नक्षत्राची रेघ 
मळभ बरसता सारे 
होती मोकळे श्वास 
डोळे मिटून घेता 
उमटे देहाशी ओंकार .. उमटे देहाशी ओंकार 

No comments:

Post a Comment