सैनिक
अचानक एक दिन कलह हुआ पंचमहाभूतोंका ,
श्रेष्ठत्व के विवादपर साथ छोडा एक दुसरोंका !!
' इन पांचोसेभी शक्तीशाली है कोई इस दुनियामे ?'
ब्रह्मदेवने चिंतित होकर पूछा हमें !
'हे भगवन् , इन पांचो के सामने हमारा एकमात्र हि काफी हें
वह आगसे भी प्रखर है , तुफ़ानोंसे भी तेज से
पानीसे गतिमान , धरती से सहिष्णु और व्योम से भी उंचा है !
वह हमारी आन हें , हमारी शान है
सऱहदपर खडा भारत माँ का जवान है !'
सर्वश्रेष्ठ होकर भी वह किसी विवाद में नही उलझता,
हमारे सुनहरे 'कल' के लिए वह हमारा 'आज' हें गवाता
गर्व हें तुमपर , नाज हें तुमपर, तुमपर हें अभिमान ,
लज्जित पंचमहाभूतों सहित हमारा कोटी कोटी प्रणाम !!
- अनुराधा प्रभुदेसाई
शहरी, चौकटीबद्ध, सुरक्षित आयुष्य जगत असतांना आपल्याला आपल्या देशसीमेवर चालणाऱ्या गोष्टींची खरंच खोलवर जाणीव असते ? आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाली पण 'स्वातंत्र्याचा' आणि एक भारतीय असल्याचा, 'भारतीयत्वाचा' खरा अर्थ आपल्याला समजलाय ? स्वैराचार आणि स्वातंत्र्य यातील फरक आपण ओळखलाय ? लक्ष्य फौंडेशन च्या अनुराधा प्रभुदेसाई यांनी जेव्हा हे प्रश्न विचारले तेव्हा ऑडिटोरियम मध्ये फक्त शांतता होती. प्रत्येक जण स्वतःला हाच प्रश्न विचारत होता, त्याची उत्तरं शोधत होतां.
'सैनिक.. तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा'. त्यांच्या बोलण्यातून हा सैनिक हळूहळू उलगडत होता. स्वान्त: सुखाय आयुष्य जगणाऱ्या सर्वांना थोडा वेगळा विचार करायला लावणारे त्यांचे शब्द .आपल्याला माहीत नसलेल्या त्याच्या आयुष्यातील दररोजच्या युद्धाशी ओळख करून देणारे शब्द ... ८ तासाच्या चौकटीत ऑफिसमधे काम करून दमणाऱ्या आपल्याला ३६/ ४० तास बॉर्डर वर एकाजागी उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकाची गोष्ट सांगणारे शब्द .. ५६ ते -५६ डिग्री तापमानात कोठेही उभा राहणारा सैनिक.. केवळ अशक्य वाटणाऱ्या गोष्टी "सिर्फ दिमाग में डाल देना हें, बाकी आसान हें " इतक्या सोप्या सरळ अर्थाने समजून त्या करणारा सैनिक ... समुद्र सपाटीपासून ८ हजार फूट ते १८ हजार फुटांवर विरळ ऑक्सिजन मधे या देशासाठी पाय रोवून उभा असणारा सैनिक ...कोणत्याच गोष्टीसाठी रिटेक ची अनुमती नसलेला सैनिक....
खरंच हा सैनिक आपल्याला माहित आहे ?
आकाशात उंच भरारी मारणाऱ्या त्या गरुडाला सुद्धा वाऱ्यापेक्षा आपल्या पंखांवर जास्त विश्वास असतो. डोक्याला जखम , हात प्लास्टर मध्ये, पोटावर नुकतीच झालेली शस्त्रक्रिया, डावा पाय मिसिंग असणारा कॅप्टन शौर्य जेव्हा "मी एकदम मस्त आहे , पण माझ्या बडीसाठी प्रार्थना करा", असं म्हणतो तेव्हा समजतं कि हा सैनिक आपल्याला कळलेलाच नाही. मिशन वर जायच्या आधी, "जर मी धारातीर्थी पडलो तर माझी मेडल्स माझ्या छातीवर लावून मग मला घरी पाठवा आणि मी सर्वोत्तम कामगिरी बजावली हे माझ्या आईला सांगा "असं लिहून ठेवणारा सैनिक मन अस्वस्थ करतो. "एकतर तिरंगा फडकावून येईन किंवा तिरंग्यात लपेटून" असं म्हणणारा कॅप्टन विक्रम बात्रा , "माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण होण्याआधी जर मृत्यूनं मला कवटाळल तर मी आधी मृत्यूचा खात्मा करेन", असं म्हणणारा कॅप्टन मनोज पांडे तर, "आई , आताच मी ट्रैनिंग वरून आलो. खूप अवघड आणि कष्टप्रद ट्रैनिंग आहे. इथे पेपर नाही, पुस्तक नाही, बरंच काही नाही.. प्रचंड बोचरी थंडी आहे सोबतीला. पण आई, तरीही अत्यंत अवघड परिस्थितीत सियाचीन सैनिक म्हणवून घेण्यात मला खूप अभिमान आहे", असं -३० तापमानात लिहिणारा मेजर कुणाल.... कारगिलच्या युद्धातील अजूनही बऱ्याच जणांना माहित नसलेला पहिला योद्धा, कॅप्टन सौरभ कालिया .... "जिंदगी ना मिलेगी दोबारा ", याचा अर्थ बहुदा यांनाच समजला होता.
आपल्या भारतीय संरक्षण दलातील या वीरांच्या गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडणाऱ्या अनुराधा प्रभुदेसाई.या प्रत्येकाची गोष्ट उलगडून सांगत होत्या.
जावेद अख्तर यांनी लिहिलंय,
" दिलोंमें तुम अपनी बेताबिया लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम
नजर में ख्वाबो कि बिजलीया लेके चल रहे हो , तो जिंदा हो तुम "...
मिशन वर जायच्या आधी हाच सैनिक पत्र लिहून आपल्या पेटिमध्ये ठेवतो, जर परत आलोच नाही तर तेच पत्र त्याच्या घरच्यांकरता शेवटच पत्र, निरोप असतो. खरंच, किती अवघड आहे हे पचवणं. असं म्हणतात एका सैनिकाच पार्थिव ठेवलेलं कफेन खूप जड असतं... हळू हळू याचा अर्थ समजत होता....
कर्नल धरमदत्त गोयल ... एलओसी पासून १०० मीटर अंतर, दर २८ सेकंदांनी होत असलेला गोळीबार तरीही मिशन फत्ते करून डोळयांदेखत बुटासकट उडालेला डावा पाय , त्यानंतर बर्फाची बरसात, दगडधोंडे, दरी, शत्रूने पेरलेले भूसुरुंग यातून सोबतच्या दोन बडींनी खांद्यावर टाकून , पाठीवर घेऊन, हाताला धरून तब्बल १२ तास चालून कॅम्पवर आणलं आणि प्रतिकूल परिथितीमुळे तब्बल २३ तासांनी मिळालेल्या वैद्यकीय मदतीनंतर कापावा लागलेला पाय.. अशा वेळी बुद्धी 'एक पाय नाही तर काय' ? असा प्रश्न विचारात होती तर मन मात्र 'सो व्हॉट , दुसरा पाय आहे', हे ठणकावून सांगत होतं." When people doubted my ability to walk , I decided to fly... हे वाक्य आणि त्यांचा आत्मविश्वास , पराकोटीचा सकारात्मक दृष्टिकोन खूप काही शिकवून गेला.
मेजर गौरव आणि त्याचे तीन जवान ... सियाचीन ग्लेशियर , १५००० फूट उंचीवर, बर्फात गाडल्या गेलेल्या चार जणांना शोधून त्या चार डेड बॉडीज हेलिकॉप्टर मध्ये ठेवायला हवामान आणि जागेमुळे हातात असलेले फक्त चार सेकंद.. "आपले बडी त्यांच्या घरी पोहोचले पाहिजेत", या एकाच उद्देशाने जिथे स्वतःच वजन सांभाळणं अवघड असत , श्वास घ्यायला त्रास होतो, वजन उचलायला त्रास होतो त्या ठिकाणी या चौघांनी मात्र हे मिशन फत्ते केलं. त्या पांढऱ्याशुभ्र बर्फावर उभं राहून त्या पायलटच्या धाडसाला दाद देत आपल्या बडींना सॅल्यूट ठोकला ... " व्हेन गोइंग गेट्स टफ , द टफ गेट्स गोइंग "....
सैनिकाची ओळख करून देणाऱ्या अशा कितीतरी गोष्टी अनुराधा प्रभुदेसाई यांनी त्यांच्या " तुमच्या उद्या साठी आपला आज देणारा सैनिक ", या पुस्तकात आपल्यासाठी लिहिल्या आहेत. आपल्यासारखाच तो हि कोणाचा तरी मुलगा, भाऊ , नवरा , बाबा असतो पण त्याआधी तो एक सैनिक असतो. आपल्यातील प्रत्येक जण सैनिक होऊ शकत नाही पण किमान एका शहीद वीराच्या आईवर " जिस देश पर मैने अपना बच्चा कुर्बान किया हें , ऊस देश से थोडा तो प्यार करो ," म्हणण्याची वेळ आपण आणू नये .
"I only regret that I have but one life to lay down for my country ", या भावनेने काम करणाऱ्या या सैनिकांचं आपण काही देणं लागतो कि नाही ? याच उत्तर आपल्यालाच शोधायला हवं.

No comments:
Post a Comment