श्रावण महिना पावसाचा .. श्रावण म्हणजे सणवार , व्रत वैकल्य.. या महिन्यात येणाऱ्या सोमवार, मंगळवार, शुक्रवार व शनिवार अशा प्रत्येक दिवसाच आपल अस एक खास वैशिष्ट्य आहेत. श्रावणात ऊन पावसाचा जसा खेळ चालतो तास काही आठवणींचा खेळ मनांत रंगतो.
लहानपणापासून प्रत्येक श्रावणात आईला काही ठरविक गोष्टी करतांना वर्षानुवर्षं पाहिलं होतं. श्रावण महिना सुरु झाला कि हिरव्या बांगड्या भरायच्या, घरी आलेल्या सुवासिनीची ओटी भरायची, रोज देवळांत जायचं, दुर्वा आघाडा यांचा हार जिवतीच्या फोटोला घालायचा, असे काही नेम तिने स्वतःसाठी बनवले होते.
श्रावणातील एका सोमवारी कुलाचार म्हणून होणारा नैवेद्याचा खास स्वयंपाक हे आमच्यासाठी नेहमी एक आकर्षण असायचं. तसं श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आई आवर्जून काही पदार्थ नक्कीच करायची. कधी गव्हाची खीर तरी कधी बिरड्याची उसळ. चुरम्याचे लाडू, घारगे असं प्रत्येक सोमवारी काही न काही ठरलेलं असायचं. बेल , आघाडा , तुळस, फुलं, दुर्वा यांनी देवघर भरून जायचं. कित्येक वर्ष श्रावणी सोमवारी मंदिरात जाणं आणि संध्याकाळी उपवास सोडताना काहीतरी गोड पदार्थ करणं हा नियम तिने कधी मोडला नाही. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी पुरण केलं जायचं, मग नैवैद्य, आरती आणि शुक्रवारच औक्षण.
आईच्या मैत्रिणींचा एक बेत असायचा. प्रत्येक शुक्रवारी एकीकडे बाकी सगळ्या मैत्रिणींनी जेवायला जायचं. सौवाष्ण जेवण,हळदीकुंकू या निमित्ताने त्यांच छानस गेट टूगेदर व्हायच. आम्ही अगदी शाळेत असल्यापासून हा नेम कधीच चुकला नाही. श्रावण महिन्यात न चुकता कित्येक वर्ष अगदी असच घडत होत ....... जणू त्या महिन्याचं time table अगदी फिक्स होत.
पण आता हा श्रावण महिना तितकासा जवळचा वाटत नाही. मला माहीत असलेला, मी पाहिलेला श्रावण कुठेतरी हरवलाय.
आई गेली आणि श्रावण महिन्यातील सारी मजाच संपली. तो जिवतीचा फोटो नाही, ते फुटाणे आणि दुधाचा नैवैद्य नाही, तिच्या हातची पुरणाची पोळी नाही, श्रावण महिन्यात आवर्जून ती भरायची ती ओटीही नाही, आणि शुक्रवारच ते औक्षण सुद्धा नाही... काय गमावलय याची जाणीव हा श्रावण मात्र दररोज करून देत राहतो..

No comments:
Post a Comment