मोहम्मद रफी
माझी पहिली ओळख या व्यक्तीमत्वाशी झाली जेव्हा मला ते कोण हे हि माहित नव्हतं इतकी लहान होते मी. माझ्या आत्याच्या घरी एका भिंतीवर त्यांचा एक खूप छान फोटो होता. तो फोटो पाहून ते कुणीतरी खूप मोठे आहेत एवढच काय ते समजल होत त्या वेळी. पण ते नक्की किती मोठे आहेत हे कळायला खूप वेळ जावा लागला, ते वय यावं लागलं. आधी गाण समजणं, त्यातला दर्द काळजाला भिडणं आणि आवाजातील आर्तता हृदयापर्यंत पोहोचण्याची समज एका वयानंतरच आली.
देवानंद आवडायचा त्यामुळे गाईड, हम दोनो या सिनेमांची पारायण केली होती अक्षरशः आणि या सिनेमातील गाण्यांनी तर वेड लावलं होत. वहिदाजी आणि देव साहेबांवरच 'तेरे मेरे सपने अब एक रंग हें , हो जहाँ भी ले जाए राहें हम संग हें'.. हे ऐकुन तर प्रेमात पडल्यावर भावना इतक्याच बोलक्या होतात असं वाटायचं.
'लाख मनाले दुनिया साथ न अब छुटेगा आके मेरे हातों में , अब साथ ना ये छुटेगा'.. हे ऐकून तर त्या आवाजाच्या प्रेमात पडावं इतका आश्वासक आणि रोमँटिक भाव त्या सीन मधेच नाही तर त्या आवाजातही होता.
"दिन ढल जाए हाए रात ना जाए, तू तो न आए तेरी याद सताये " या गाण्यात शैलेंद्रचे शब्द जणू जीव ओतून गायलेत रफी साहेब. कित्येक वेळा हे गाणं आजवर ऐकलंय आणि प्रत्येक वेळी डोळ्यांचे काठ मनसोक्त वाहीलेत...आंत कुठेतरी खोलवर पोहोचलेला तो दर्द आणि ती आर्तता.
'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया' हे गाणं लक्षात राहीलं ते त्यातील लायटरची धून व रफी साहेबांकरताच.
'अभी ना जावो छोडकर के दिलsss अभी भरा नहीं ' हे ऐकतांना तर आपल्यासाठी कोणीतरी असंच गाणं म्हणावं असं वाटायचं. 'बागों में बहार हें, कलियों पे निखारे हें ', ' गुन गुना रहे हें भवरे खिल रहीं हें कली कली' अशी गाणी ऐकतांना, आपणही प्रेमात पडाव एवढाच काय तो विचार यायचा.
"चौदहवी का चाँद हो या आफताब हो , जो भी हो तुम खुदा कि कसम लाजवाब हो ", असो किंवा ' मैने पुछा चाँद से के देखा हें कही, मेरे यार सा हसीन ?चाँद ने कहां , चांदनी कि कसम, नही..नही.. नही '... तसंच, 'तेरी बिंदिया
रे, आए हाए' किंवा 'झिलमिल सितारों का आंगन होगा ', " सौ साल पेहेले मुझे तुमसे प्यार था " .. या इतक्या गोड गाण्यांना आवाजाच्या जादूने सजवलय ते फक्त रफींनी.
"ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या हें "या प्यासा मधील साहिरच्या शब्दांना रफीजींनी आपल्या अफाट जादूई आवाजाने चार चाँद लावलेत.
'मांग के साथ तुम्हारा मैने मांग लिया संसार ' म्हणताना दिलीपकुमार काय आवडलाय. 'अगर तुम भूला न दोगे सपने ये सच हि होंगे, हम तुम ...' हे गाणं असो किंवा 'तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल हें ', असो, एकदा ऐकून समाधान होतच नाही या गाण्यांचं. परत परत ऐकत राहावं ...
मध्यंतरी माझ्या वाचनात आल कि एकदा ओ. पी . नय्यर म्हणाले होते ,' मोहम्मद रफी ना होता तो ओ. पी. नय्यर ना होता.. काय भारी ना !! दोघांच्या दोस्तीला सलाम !!!
आयुष्यातील कित्येक क्षणांत, कितीतरी प्रसंगात या आवाजाची सोबत होती.. कित्येकदा डोळे मिटून बसले असतांना मागे त्याचा आवाज रेडिओवर होता....
हि गाणी सोबत असतांना प्रेमात पडलेल्या त्या जुन्या पिढीबरोबर आपल्याला सुद्धा हि गाणी ऐकायला मिळाली , enjoy करता आली म्हणून खरं तर आपणही नशिबवान आहोत.
रफी साहेबांची हि आवाजाची जादू अशीच सोबत राहो ....

No comments:
Post a Comment