का अस वाटतंय कि,
काहीतरी माग राहिलंय
मनामधे जपलेल
दोघांकरता वसलेलं
ते गाव मात्र हरवलंय ,
खरच, काहीतरी माग राहिलंय...
स्वप्नांची पानगळ होऊन
आता रानामध्येच पसरलीए
चाहूल आपल्या दोघांची
पिवळ्या रानफुलांत हरवलीए
तरी डोंगरदर्यांत अजूनही
आपलं गूज असेल का ?
रेंगाळलेल्या वाटेवरती
सांग, अंतर हळूच मिटेल का
साहिरच ते गाणं परत
मैफिलीत या सजेल का
ओंजळभर बकुळीचा
गंध तसाच दरवळेल का
मळभ दाटून आल्यावर
तीच हुरहूर वाटेल का
हरवलेलं प्रेम आपलं
पुन्हा कधी गवसेल का .....
काहीतरी माग राहिलंय
मनामधे जपलेल
दोघांकरता वसलेलं
ते गाव मात्र हरवलंय ,
खरच, काहीतरी माग राहिलंय...
स्वप्नांची पानगळ होऊन
आता रानामध्येच पसरलीए
चाहूल आपल्या दोघांची
पिवळ्या रानफुलांत हरवलीए
तरी डोंगरदर्यांत अजूनही
आपलं गूज असेल का ?
रेंगाळलेल्या वाटेवरती
सांग, अंतर हळूच मिटेल का
साहिरच ते गाणं परत
मैफिलीत या सजेल का
ओंजळभर बकुळीचा
गंध तसाच दरवळेल का
मळभ दाटून आल्यावर
तीच हुरहूर वाटेल का
हरवलेलं प्रेम आपलं
पुन्हा कधी गवसेल का .....
No comments:
Post a Comment