Monday, March 9, 2015

' बालपण '

दूर निसटलं ते बालपण, 
आतां आठवणीत शोधावं 
क्षणभर सारं विसरून,
थोडं परत मागे फिरावं 

लहानपणीची ती भातुकली,
नव्याने परत मांडावी 
लुटूपुटूच्या भांडणातील, 
तशीच मजा लुटावी 

चिमुकले इवले हात धरून,
'ती' चार पावलं चालावं 
ताई बनून त्याच्याशी,
अगदी तसंच खेळाव

खिडकीत थांबून बाबांची ,
तशीच वाट पहावी
अवघड गणिते पुन्हा एकदा,
त्यांच्यासोबत सोडवावी 

आई बाबांच्या पंखांखाली,
घरट्यात थोडं निजावं 
निरागस ते क्षण सारे,
थोडं उधार मागून जगावं 

आठवणींच्या या रंगांमध्ये,
खरंच वेगळी मजा आहे 
कितीही मोठे झालो तरी,
बालपण मात्र तसंच आहे  !!!



No comments:

Post a Comment