Thursday, February 26, 2015


' धुंद रेशमी धुके '

निळ्या नभी कोर हि, आज का हासली

हात तू हातांत घेतां, रातराणी लाजली …. 

सावळी रात हि, सोबती चांदवा

शब्द होतां मुके, उमलती पाकळ्या …

साथ हि कालची, आज वाटे नवी
ओंजळीत दाटली, स्वप्नं चांदण्यातली…. 

स्पंदने थांबली अन् हरवले भान हे 

सभोवती दाटले, धुंद रेशमी धुके …. 













No comments:

Post a Comment