बाराखडी
कांतेय लहान असतांना त्याला 'र' हे अक्षर म्हणता येत नव्हतं, अगदी शाळेत जायला लागला तरी सुद्धा ! 'बोबड कांदा' तर तो होताच आणि र ऐवजी ल म्हणून अजूनच धमाल उडवून दयायचा. माझ्या सासऱ्यांनी त्याला " अरे रे रे रे, मी काय करू रे , मला र म्हणता येत नाही रे , अरे रे रे रे ".. हा कानमंत्र दिला होता. त्यामुळे त्याचे "अले ले ले ले, मी काय कलू ले "... हे सतत ऐकून काय करावं असा प्रश्न मला खूपदा पडायचा.
दरवेळी डॉक्टरांकडे गेले कि मी त्यांना विचारायचे कि 'काय केलं म्हणजे याला र म्हणता येईल?', तेव्हा त्या हसून 'येईल ग', इतकंच उत्तर द्यायच्या. एकीकडे मी त्यांच्या त्या उत्तरावर निर्धास्त होते मात्र दुसरीकडे सगळं घर र हे अक्षर गिरवीत होतं. त्याची आजी वरचेवर त्याच्यासाठी तोंडल्याची भाजी करायची, त्याची पणजीआजी 'अथर्वशीर्ष शिकव ग त्याला', असं सांगायची आणि त्याचे आजोबा अथर्वशीर्ष शिकवायचे. आणि हो त्याचा बाबा, तेव्हापासूनच कूल डॅड या भूमिकेत असल्याने र या एका अक्षराने आपलं काहीही अडणार नाही असं मला सांगत राहायचा...
आता पंधरा वर्षांनंतर पात्र बदलली, अक्षर सुद्धा बदललं पण बाराखडी मधली मजा मात्र अजूनही तीच आहे याची काल प्रचिती आली जेव्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाली. केदारनी सांगितलं कि माझा भाचा ऋषित याला ळ हे अक्षर म्हणता येत नाही ! मग काय आतां आजोबांना अथर्वशीर्ष शिकवायला आणि आत्याला तोंडल्याची भाजी करायला एकदम स्कोप आहे तर, मग काय लागले सगळे कामाला !
आजकाल मुलांना, आपण घरी मराठी बोलत असल्यामुळे आणि शाळेतील इंग्रजी माध्यमामुळे या दोन्ही भाषांची ओळख लहानपणापासूनच होते. ऋषित या बाबतीत जरा Lucky आहे कारण त्याच्या नाना नानींमुळे त्याला हिंदी या अजून एका भाषेची ओळख लहानपणापासून झाली आहे. 'ससा ससा तो कापूस जसा' , 'Twinkle Twinkle' बरोबरच तो 'आहा टमाटर बडे मजेदार आहा टमाटर बडे मजेदार' हे गाणं सुद्धा तितकंच छान म्हणतो ! एकूण काय मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि जागतिक भाषा माझ्या माहेरी अगदी गुण्या गोविंदाने नांदतातेय !
अशा तीन तीन भाषा आजूबाजूला बागडत असतांना त्यांतील ळ अक्षर हरवलंय हे समजताच काल मात्र एकदम धमाल उडाली घरी. ऋषित कडून काळा, निळा, पिवळा हि रंगांची नावं म्हणून घेता घेता केदारच्या मदतीला एकदम गदिमांच गाणं आलं कारण 'ळ' या अक्षराचं सौन्दर्य दाखवण्याकरता गदिमांनी या गाण्यांत ते तब्बल तेरा वेळा वापरलं आहे !
'घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा ..' मग काय केदारच्या तोंडी हे शब्द ऐकताच ऋषितची प्रतिक्रिया एकदम बोलकी होती. छान मराठी बोलणाऱ्या माझ्या भाच्याने डायरेक्ट हिंदी लहेजामध्ये त्याला, 'ये कौनसी भाषा में बोल रहे हो ?' .. असं विचारून अक्षरशः निःशब्द केलं !
त्यामुळे सध्या या गाण्यावरून प्रेरित होऊन आमचं घर ऋषित सोबत त्याचं हरवलेलं ळ अक्षर शोधण्यात व्यस्त आहे ! पुढच्या गणपती पर्यंत आपच्या कृष्णाला त्याच्या गोकुळांत ळ हे अक्षर मिळो याच सदिच्छा !!!!

No comments:
Post a Comment