ऑक्टोबर
खूप मिक्स Review ऐकून हा सिनेमा पाहावा कि नाही असा विचार केला पण सहसा कोणताही वेगळा विषय असाच न पाहाता सोडून देणं जमत नाही म्हणून मग आवर्जून पहिला आणि वाटलं पाहीला नसता तर खूप काही miss केलं असतं. दिग्दर्शक शूजित सरकार आणि वरून धवन हे जे काही कॉम्बिनेशन आहे ते एकदम जादू करतं आणि ते वेगळेपण आपल्याला पूर्ण वेळ बांधून ठेवतं ...
वनिता संधू ने साकारलेली शिउली,गीतांजली राव ने साकारलेली तिची आई आणि वरून धवनने साकारलेला डॅन यांच्यातील वीण , एकमेकांबरोबर निर्माण होत जाणारं नातं आपल्याला निरपेक्ष प्रेम म्हणजे काय हे सांगत राहतं ...
फाईव्ह स्टार हॉटेल , हॉटेल मॅनॅजमेन्टच्या अभ्यासातील भाग म्हणून तिथे काम करणाऱ्या काही जणांचा ग्रुप.. त्यांच्या कामाच स्वरूप, पद्धत , तेथील प्रत्येकाची जबाबदारी, ती निभावताना त्यांना येणारे रोजचे वेगवेगळे अनुभव आणि आपल्या टीम मेंबर ला सावरण्यासाठी धडपडणारे टीम मधील मित्र मैत्रिणी.... अशा एकदम हलक्या फुलक्या वातावरणांत या सिनेमाची सुरवात होते. याच टीम मध्ये असतात शिउली आणि डॅन. दोघंही भिन्न स्वभावाचे..एकमेकांबरोबर खुपसा संवाद नसणारे, जवळची मैत्री नसलेले तरीही टीम मुळे एकत्र आलेले.
३१ डिसेंबर च्या पार्टीत अपघाताने शिउली तिसऱ्या मजल्यावरून खाली पडते आणि कोमात जाते आणि याच वळणावर चित्रपट खऱ्या अर्थाने सुरु होतो... हॉस्पिटल मध्ये शिउली कोमात असतांना, तिची ट्रीटमेंट सुरु असतांना दुसरीकडे बाकीच्यांच आयुष्य हळूहळू नॉर्मल होतं. शिउलीचे शेवटचे शब्द 'Where is dan ?' डॅनला अस्वस्थ करतात आणि तिथेच एक नातं जन्म घेत.. आणि याच निःशब्द नात्याची गोष्ट आहे ऑक्टोबर ....
'Where is Dan ?' हे शब्द त्याला स्वस्थ बसू देत नाहीत .. या प्रश्नाच्या मागचं कारण आणि तिला त्या प्रश्नाचं द्यायचं असलेलं उत्तर यासाठी सुरु होते त्याची धडपड. अगदी छोट्या छोट्या संवादातून त्याच मन उलगडत जातं. पहिल्यांदा तिला ICU मध्ये पाहून आल्यापासून त्याची होणारी घालमेल आपल्यालाही अस्वस्थ करते.
शिउलीच्या आईची प्रचंड ताकदीची भूमिका गीतांजली रावने साकारली आहे. कमी संवाद असूनही त्या मोजक्या संवादात, नजरेतून व्यक्त होणारी कणखर आई.. शिउलीने प्रथम अम्मा म्हटल्यावर कोसळणारी आई .. आणि शिउली गेल्यावर तिच्यासाठी लावलेलं प्राजक्ताच झाड एकटं कसं ठेवणार म्हणून ते डॅनला देणारी आई .. आपल्याला सुन्न करते.
शब्दांत काहीही न बोलू शकणारी, फक्त डोळ्यांनी बोलणारी शिउली आणि तिच्या संवेदना जाणून घेणारा डॅन खूप काही सांगून जातात आणि आपण त्या नात्याच्या प्रेमात पडतो...
हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट देणारे डॉक्टर खरंच जिनियस आहेत ना याची खात्री reception वरच्या माणसाशी बोलून करून घेणारा डॅन, रात्री हॉस्पिटल मध्ये एन्ट्री साठी पास नाही म्हणून security ला convince करणारा डॅन, रोज हॉस्पिटल मध्ये जावून शिउलीला भेटणारा आणि मनातलं बोलणारा डॅन, तिच्यासाठी तिची आवडती प्राजक्ताची फुलं वेचून तिच्या उशाशी ठेवणारा डॅन, सिस्टरच आयुष्य जवळून जाणून घ्यायचा प्रयत्न करणारा डॅन, शिउलीच्या काकांपासून व्हेंटिलेटरच स्वीच लांब ठेवण्याची काळजी घेणारा डॅन, तिचा मृत्यूबरोबरचा संघर्ष थांबावा आणि परत तिचं आयुष्य सुरु व्हावं म्हणून झटणारा डॅन आणि तिच्या आई समोर खूप positive energy घेऊन उभा असलेला डॅन ..... डॅन या व्यक्तिरेखेत खुप काही आहे. अतिशय हळुवार पणे उलगडत जाणारी त्याची व्यक्तिरेखा.. तो माणूस म्हणून किती प्रगल्भ आहे, याचा प्रवास मनाला खूप भिडतो.
प्राजक्ताची इवलीशी फुलं .. कमी आयुष्य असणारी . झाडावरून ओघळून पडणारी .. त्यांचा आणि शिउलीच्या आयुष्याचा संदर्भ नेमकेपणाने इथे टिपला जातो...
करियर चा विचार सोडून, रेस्टॉरंटच स्वप्न विसरून तो शिउली मध्ये गुंतत जातो. तिच्या कोमातून बाहेर आल्यावर होणाऱ्या छोट्या छोट्या प्रगतीमध्ये खुश होतो. तिच्या डोळ्यांच्या हालचालीत स्वतःला शोधतो. तिच्या पासून दूर जावून राहू शकत नाही तेव्हा परत येवून तिचं आणि त्याचं असलेलं निःशब्द नातं परत जपतो...
शिउलीच जाणं स्वीकारून तिच्या घरातील प्राजक्ताच झाड आठवण म्हणून घेऊन जाणारा डॅन , या फ्रॅम वर सिनेमा संपतो...
नक्की पाहावा असा 'ऑक्टोबर ' ....

No comments:
Post a Comment