बालभारती
बालभारती या शब्दाशी आपली पहिली ओळख झाली आपण शाळेत असतांना आणि तेव्हापासूनच या शब्दाभोवती आपल्या कितीतरी छान आठवणी गोळा होतं गेल्या.
जून महिना आला कि शाळा सुरु होण्याचे वेध लागतात. नवीन वह्या, नवीन दप्तर आणि नवीन पुस्तकं !हि नवीन पुस्तकं आली कि त्या कोऱ्या पुस्तकाच्या वासाबरोबर त्यातील अनेक सुंदर सुंदर गोष्टी आणि कविता वाचतांना मिळणारा आनंद प्रत्येकानेच अनुभवलाय. शाळेचे ते छान दिवस आणि तेवढ्याच अमूल्य त्या आठवणी आज आपल्या प्रत्येकाच्याच मनांत अजूनही ताज्या आहेत. बालभारतीच्या पुस्तकांतील याच आठवणी पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी माझ्या मुलामुळे मला मिळत गेली.
दोन वर्षांपूर्वी इयत्ता नववीचा अभ्यासक्रम बदलला. शाळा सुरु होऊन महिना झाला तोवर एका पाठोपाठ एक नवीन अभ्यासक्रमाची पुस्तकं बाजारात येत होती. त्याच वेळी पुढच्या वर्षी दहावीचा अभ्यासक्रम बदलणार असं समजलं. पुढच्या वर्षी दहावीची पुस्तकं वेळेत येतील कि नाही म्हणून चर्चाही झाली. त्या वर्षीचा अनुभव बघता पुढ्च्या वर्षीच्या पुस्तकांचं थोडं जास्तच टेन्शन होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
नववीच्या दिवाळीपासूनच १० वीच्या क्लासेसच्या ऍडमिशन सुरु झाल्या आणि परत एकदा दहावीची पुस्तकं हा विषय चर्चेकरता बाहेर आला. ९ वी ची परीक्षा झाली कि लगेच १० वी चा क्लास सूरु होणार, शाळा सुरु होणार पण मग पुस्तकांचं काय ? आम्हा मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये तर हमखास या विषयावर बोलणं व्हायचच. शेवटी ठरलं कि आपण बालभारतीच्या ऑफिस मधेच फोन करू आणि विचारू , म्हणजे नक्की काय ते समजेल.
साधारण जानेवारी महिन्यामध्ये मी फोन केला कि, 'मला १० वी च्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची चौकशी करायची आहे कि ती पुस्तकं साधारण केव्हापर्यंत बाजारात येतील ?'. पलीकडून अतिशय जबाबदारीने उत्तर आलं कि "अजिबात काळजी करू नका, आम्हाला सुद्धा मुलांची चिंता आहे. आम्ही शनिवार रविवार सुटी न घेता काम करतो आहोत. सर्व शिफ्ट मध्ये काम सुरु आहे. ताई , तुम्हाला तुमच्या एका मुलाची चिंता आहे पण अहो आम्हाला सर्व मुलांची चिंता आहे , नका काळजी करू. आम्हाला सांगितलंय ना वेळेत करायचं ते आम्ही करू". हे ऐकून मला सुखद धक्का बसला. 'खूप खुप धन्यवाद' इतकंच बोलू शकले मी तेव्हा. आजकाल आपण किमान नीट उत्तर मिळावं इतकीच अपेक्षा करतो पण इथे मिळालेल्या उत्तरात तर खूप काही होतं. एक जबाबदारी, ठामपणा, वेळेचं बंधन पाळण्याची जिद्द आणि आपल्या कामावरची श्रद्धा. आजकाल दुर्मिळ होत चाललेल्या अशा अनुभवाने मी मात्र भारावून गेले.
मग हाच निरोप पुढे मैत्रिणींना सांगितला आणि प्रत्येकीचा जीव थोडा का होईना पण भांड्यात पडला. फेब्रुवारी महिना गेला, मार्च महिन्यात एप्रिल महिन्याचं शाळेचं वेळापत्रक मिळालं. पंधरा एप्रिल पासून १० वी ची शाळा सुरु होणार होती. झालं , परत एकदा सर्व चर्चा पुस्तकांवरच येऊन थांबली .
मी परत एकदा बालभारती मध्ये फोन केला आणि चौकशी केली. तेव्हा पलीकडून मिळालेला प्रतिसाद सुद्धा पहिल्या इतकाच छान होता. "ताई, प्रुफ चेकिंग झालंय , पुस्तकं प्रिंटिंग मध्ये आहेत. अहो मुंबईला जावं लागतं प्रूफ चेकिंगला . आठवडा आठवडा लागतो तिथं थांबायला. प्रूफ चेकिंग मोठं काम असतं, प्रिंटिंग काय आमच्या हातात आहे, ते मशीनवर करायचं, ते आम्ही करू आता. तुम्हाला शाळा सुरु होईपर्यंत पुस्तकं नक्की मिळणार साधारण एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात हे नक्की आणि हो तुम्हाला अजून खात्री करायची असेल तर साहेबांशी बोला कि, त्यांना पण खूप फोन येतायेत खात्री करण्यासाठी, " मी त्यांचे आभार मानून फोन ठेवला.
मला जे ऐकायचे होतं तेच उत्तर मिळालं म्हणून मी हा प्रतिसाद किंवा अनुभव सुखद होता असं नाही म्हणत तर माझ्यासारखेच शंका असणारे अनेक पालक फोन करतच असतील त्यांना पण प्रत्येकाला न कंटाळता उत्तर देणं , तो विश्वास दाखवणं खूप महत्वाचं आणि बालभारतीची टीम हे सर्व करत होती.
सांगितल्याप्रमाणे ३ एप्रिल २०१८ ला बालभारती ने दहावीची सर्व पुस्तकं उपलब्ध करून देऊन दहावीच्या सर्व मुलांना , पालकांना आणि शिक्षकांना एक सुखद धक्का दिला.
या वर्षी दहावीची पुस्तकं , परीक्षेचं स्वरूप सर्वच बदललेलं. त्यामुळे साहजिकच मागच्या कोणत्याही परीक्षेचे पेपर तसे उपयोगी पडणारे नव्हते. सराव करण्याकरता काहीच उपलब्ध नव्हतं. हि नेमकी अडचण ओळखून बालभारतीने प्रत्येक विषयाचे ३ / ४ पेपर आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले . इतकंच नाही तर ते पेपर तपासण्यासाठी त्यांची उत्तर पत्रिका सुद्धा दिली यामुळे सर्व पालकांना खूप खूप मदत झाली.
वेळेवर पुस्तकं आली नाहीत कि आपण अगदी उघडपणे बालभारतीला दोष देतो; त्या मागची कारणं सुद्धा शोधायचा प्रयत्न करत नाही परंतु यावर्षी वेळेवर किंवा वेळेआधी पुस्तकं तयार करण्यात बालभारती टीमने जो पुढाकार घेतला, जे कष्ट घेतले त्याच खरंच खूप खूप कौतुक आहे.
एकूण काय तर या दहावीच्या निमित्ताने बालभारती कार्यालयातील फोनवरचा माझा प्रवास मला अनेक सुखद अनुभव देऊन गेला !

No comments:
Post a Comment