प्रत्येकाच्या खिडकीतलं आभाळ तसं वेगळं
निळाई असते तीच तरी क्षितिज मात्र वेगळं
आसमंती गंधाळतो कधी माळलेला मोगरा
केशर शिंपीत जाणारा तो कधी सोबत निळा चांदवा
गाढ एकांतात कधी असतो नजरेचाच आवाज
डोळ्यांमध्ये विस्कटलेली ती काजळ काळी पहाट
निळ्या सावळ्या स्पर्शाचा सतारीचा झंकार
शब्दांविना फुलतो जसा पावरीचाच आवाज ....
No comments:
Post a Comment