'जंगल जंगल बात चली हैं पता चला हेंsssss
चड्डी पेहेन के फुल खिला हें , फुल खिला हें '
हे गाणं म्हणायला सुरवात करताच माझा सव्वावर्षाचा भाचा चालू असलेली दंगा मस्ती , खेळ सारं काही थांबवून, एकदम जणू काही तो क्षण पॉझ व्हावा असं माझ्याकडे एकटक पाहू लागला. ती चाल , आवाज आणि काही प्रमाणात शब्दही आतां त्याच्या थोडे ओळखीचे झाले होते बहुदा ... कधी त्याचे कपडे बदलतांना, त्याच आवरताना तर कधी त्याच्याशी खेळतांना, कधी त्याला अंघोळ घालतांना मी कोणतही गाणं म्हणायला सुरवात करायचे आणि प्रत्येक वेळी तो असाच माझ्याकडे एकटक पाहात राहायचा. अगदी सा, रे, ग, म, प, ध, नी , सां आणि सां, नी, ध , प , म , ग, रे, सा हे जरी म्हटलं तरी त्याची प्रतिक्रिया तीच असायची, खूप मजा वाटायची.
आपलं वय वाढतं तसं जुन्या आठवणी खूप प्रकर्षाने समोर येत राहतात. त्यातले काही क्षण परत एकदा जगावं असं वाटू लागतं. प्रत्येकीच्या आयुष्यातील काही खास क्षणांमधला एक खास क्षण असतो 'आई' होण्याचा.... त्या इवल्या जीवाला जपतांना, आई होताना खूप सुंदर आठवणी आपण गोळा करतो. त्याला शब्द समजत नसले तरी त्याच्याशी बोलतो, स्पर्शातून;त्याला झोपवताना अंगाई म्हणतो. आपलं ते नातं प्रेम,लळा,वात्सल्य, स्पर्श आणि आवाजाच्या कोंदणात हळूहळू रुजतं, बहरतं.
आज, आयुष्याच्या या वळणावर परत एकदा मी हेच क्षण अनुभवत होते. एकदा आई झालं कि कोणत्याही नात्यांत आई ची भूमिका सहज निभावू शकतो आपण, तसंच काहीसं. तेच इवलस रूप आणि तीच मोठ्ठी ओढ ... बाळ एक दिवसाचं असो अथवा एक वर्षाच , त्याला झोपवताना ओठातून आपसूकच अंगाई गीत येतं , 'निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई ' हे गाणं तसं खास आवडीचं.मनाजवळच. 'मिट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई ', 'जगावेगळी हि ममता, जगावेगळी अंगाई ' हे म्हणताना काय वाटत ते शब्दांत बांधण केवळ अशक्य.'निज रे लडिवाळा, बाळ गुणी झोप नेली रे कोणी , गाई अंगाई'.... अशी अंगाई गाऊन बाळाला झोपवण्यात काय मजा आहे हे अनुभव घेऊनच समजतं. आईच्या मनातील भावना यापेक्षा अजून काय वेगळी असेल; इतके हे नेमके शब्द आणि भाव.
' दो नैना और एक कहानी ; थोडासा बदल थोडासा पानी, और एक कहानी ', गुलज़ारजींचे शब्द. काय मिठास आहे त्यात.. 'धीरे रे आजा रे अखियन में , निंदिया आजा री आजा' हे गाणं असो किंवा ' सुरमई अखियों में , नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे '... हळूहळू आपल्या अंगाई गीताच्या लिस्ट मध्ये गाणी वाढत जातात आणि आपण बाळ व अंगाई या समीकरणात अगदी रमून जातो.
आज मुलं कितीही मोठी झाली असली तरीहि रात्री झोपताना त्याला थोपटावं , जवळ घ्यावं, काहीतरी गुणगुणाव असं प्रत्येक आईला वाटतच कारण ती अंगाई आजही तिच्या मनात कुठंतरी घोळत असतेच.

No comments:
Post a Comment