ओझ ....
डोंगरमाथा चढून आल्यावर,
डोक्यावरची पाटी उतरवली
अन् सावलीत थोडी विसावताच
ती अगदी ताजीतवानी झाली
तिचं ओझं उतरलं...
तिचं ओझं उतरलं,
ते पाहून मला जाणीव ,
माझ्याही ओझ्याची झाली
पण दाखवायला माझ्या डोक्यावर
तिच्यासारखी पाटी नव्हती,
तिची वेगळी पाटी ,
माझीही वेगळी पाटी
ओझी दोन्हीकडेही होती
वागवण्याची जागा मात्र
तिची डोईवर अन् माझी मनांत होती ...
डोंगरमाथा चढून आल्यावर,
डोक्यावरची पाटी उतरवली
अन् सावलीत थोडी विसावताच
ती अगदी ताजीतवानी झाली
तिचं ओझं उतरलं...
तिचं ओझं उतरलं,
ते पाहून मला जाणीव ,
माझ्याही ओझ्याची झाली
पण दाखवायला माझ्या डोक्यावर
तिच्यासारखी पाटी नव्हती,
तिची वेगळी पाटी ,
माझीही वेगळी पाटी
ओझी दोन्हीकडेही होती
वागवण्याची जागा मात्र
तिची डोईवर अन् माझी मनांत होती ...
No comments:
Post a Comment