' मागे उरले आभास '
मागे उरले आभास, आता कित्येक क्षणांत
मागे उरले आभास, आता कित्येक क्षणांत
सुन्या, रित्या घरट्यात, येई तुझी आठवण
आता चाहूल ती नाही, ना कांकणांचा नाद
देवासमोर त्या आता, एक शांत निरांजन
सुन्या उंबऱ्यात तरी, होई रांगोळीचा भास
तुळशीच्या खाली दिसे, मग गडद काळोख
तुझ्या हाताची ती चव, आतां उरे आठवणींत
रूप तुझे दिसे कधी, स्वप्नांच्या ओंजळीत
असा कसा हा अबोला, सांग तुझ्यात माझ्यात
नियतीने का गं केला, असा व्याकूळ प्रहार
जगण्याचा आता कळे,एक वेगळा हा अर्थ
एका क्षणांत विरला, कसा धागा तो अतूट
तू नसूनही आहे, इथे आमच्या समीप
डोळे मिटताच दिसे, पहा आई ती सुंदर !!!
No comments:
Post a Comment