Sunday, February 22, 2015

' शब्द '

भेटतील तुला कधी शब्द माझे,
त्या बकुळ फुलापरी जपलेले
तू नसतां या ओठांवरती,
तुझ्याच करतां सूचलेले …

उमजेल का तू सांग तेव्हा,
मनातले ते तुझ्या तूला
मन पाखरू होऊन क्षणभर,
सांग हरवेल का पून्हां पून्हां …

आज निसटले क्षण सारे ते,
श्वासातं उरली हुरहूर ती
जातां जातां तुजला दिधली,
मी सोबत शब्दांची नवी  !!



No comments:

Post a Comment