सांग, असच होतं ना तुलाही...
आकंठ तुझ्यात हरवतांना उगवते गहिरी रात्र,
हलके पसरतं आभाळभर आठवणींच शुभ्र चांदणं
ओठांवरती तेव्हा एकचं गीत येतं ,'याद पिया कि आए'..
सांग, असच होतं ना तुलाही...
कॉफीचा घमघमाट पसरतां मागे गुलजार आवडतो
'एक सौ सोला चाँद कि राते' अन् पाऊस आठवतॊ
प्रत्येक गाण्यात लपलेली दिसते तुझी एकेक आठवण,
सांग, असच होतं ना तुलाही...
No comments:
Post a Comment