गुरुपौर्णिमा
शाळेत असतांना काय मस्त साजरा करायचो हा दिवस ! आपल्या लाडक्या शिक्षकांसाठी गजरा, गुलाबाची फुलं , चाफ्याची फुलं, निशिगंध आठवणीने न्यायचो. कार्यक्रमांत छोटंस भाषण करायचो , एखादी कविता वाचून दाखवायचो. या सर्वामागे एक भावना असायची. त्यांनी जे भरभरून दिलं त्या ऋणांत राहण्याची, आपलं प्रेम आपला आदर व्यक्त करण्याची.
ती शाळा आतां खूप मागे राहिली. प्रथम आई वडिलांनी शिकवलं नंतर शिक्षकांनी. कधी मोठ्या भावंडानी शिकवलं तर कधी घरातील मोठ्यांकडून शिकलो. बाहेर पडलो तर जगाकडून शिकलो आणि कधी निसर्गाकडून. प्रत्येक ठेच काहीतरी शिकवून गेली. आपण आपली ओंजळ कायम उघडीच ठेवली म्हणून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जे कोणी भेटलं त्या प्रत्येकाकडून काही ना काही आपण वेचत आलो आणि स्वतःला समृद्ध करण्याचा प्रयत्न करत राहिलो. असं म्हणतात आपण कायम शिकत राहिलं पाहिजे कारण तीच जगण्याची खरी ओळख आहे.
आजकाल आपली मुलं सुद्धा आपले गुरु आहेत. काहीही अडलं कि विचार त्यांना. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप कशातही अडलं कि आपल्या मुलांकडून शिकतो आपण. मुख्य म्हणजे आपलं अज्ञान त्यांना दाखवायला लाजही वाटत नाही आपल्याला. लेटेस्ट फॅशन , एखादा गेम, मोबाईल मधलं एखादं ऍप, एखाद्या शब्दाचा उच्चार, एखादा हटके नवीन पदार्थ किंवा एखादं प्रसिद्ध इंग्लिश song शिकवतो हा गुरु आपल्याला, छोटा असला तरी आपल्यासाठी महागुरु असतो हा आपला हक्काचा ! अजूनही आपण त्याचे गुरु आहोत हे विसरून जातॊ तो आणि मनापासून शिकवत असतो आपल्याला, या आभासी व Technical जगात काय चाललंय ते :)
दुसरी असते आई. अहो आई आणि अगं आई साठी तर आपण कायम लहान असतो त्यामुळे त्यांच्या असंख्य प्रेमळ सूचना, रागावणं ऐकत ऐकत आपणही आपल्याला तयार करत असतो. खरे पैलू कसे पाडायचे हे त्यांनाच माहित असतं, हिऱ्याची खरी ओळख तर त्यांनाच असते. त्यांच्या अंगावरील प्रत्येक सुरकुती जणू एक अनुभव सांगून शिकवत असते. आपल्याला मोठी बहीण, मावशी असली कि त्यांनाही यांचीच गादी चालवायची असते.
गुरु शिष्याचा नात्याचा हा धागा असाच मोठा होत जातो.
मग येतो नवरा. मोठा असतो वयानं,अनुभवानं पण गुरुचा दर्जा फार कमी वेळा दिला जातो. एक तर त्याला शिकवायला चान्स मिळत नाही आणि मिळालाच तर आपण शिकत नाही !
पुढचा लाडका गुरु म्हणजे आपल्या मैत्रिणी. आपला खूप वेळ आपण त्यांच्या सोबत घालवतो. आपले स्ट्रॉंग आणि वीक दोन्ही पॉईंट्स त्यांना माहित असतात. आपल्या प्रत्येक मैत्रिणी कडून आपण काही न काही नक्की शिकत असतो. कोणाचा लाघवी स्वभाव, स्फटिकासारखं निर्मळ स्वच्छ मन आपल्यालाही अंतरंगात डोकवायला सांगत. मदतीला सदैव तयार कसं असावं हे कोणी आपल्या वागण्यातून दाखवत तर कोणी साक्षात अन्नपूर्णेचा आभास वाटावा इतकं रुचकर नातं पोटातून मनापर्यंत नेतं ! कौतुक कसं करावं हे प्रात्यक्षिक पाहून आपलंही मन हेलावतं. अडचणीत सुद्धा ठामपणे उभं राहणारं कोणी वादळांत उभं राहणं शिकवतं तर कोणी नात्यांना हळुवार जपायला. मनांत साठलेलं मोकळेपणाने व्यक्त होऊन कोणी नात्यातील ओलावा जपायचा प्रयत्न करणं शिकवतं तर कोणी जिद्दीने एखादी गोष्ट साध्य कशी करावी हे आपल्या प्रयत्नांमधून दाखवून देतं .. जबाबदारीचं ओझं न मानता त्याला आनंदाने कसं पेलावं हे अगदी सहज पणे इथे बघायला मिळतं . इथे प्रत्येकीचा एक खास गुण एकमेकींवर अवलंबून राहणं शिकवतो. मोत्यांच्या सरीतला प्रत्येक मोती महत्वाचा कारण सर्व मोती एकत्र आल्यावरच त्याचा सुंदर सर बनतो आणि मैत्री हेच तर शिकवते.

No comments:
Post a Comment