" और हम खडे खडे बहार देखते रहें, कारवाँ गुजर गया गुबार देखते रहें .... "
कवी नीरज यांच्या याच ओळी आठवल्या, ते गेल्याची बातमी वाचतांना.
'वयाच्या १४ व्या वर्षी कविसंमेलनात आपली पहिली कविता सादर करून टाळ्यांच्या कडकडाटात मिळालेलं पाच रुपयांचं बक्षीस आणि त्यातील आनंद नंतर मिळालेल्या दोन्ही पद्म पुरस्कारांत नव्हता', असं एकदा तेच म्हणाले होते.
लहानपणी बिडी सिगारेट विकल्या , रिक्षा ओढली , औषधाच्या जाहिरातीचं काम मिळालं म्हणून भिंतीही रंगवल्या, यमुना नदीत उडी घेऊन नाणी वेचली.. अशा आयुष्याने भरभरून अनुभव दिले आणि परीक्षेत एका मार्काने नापास झाल्यावर जिद्द हि दिली... पुढे टायपिस्ट , इन्फॉरमेशन ऑफिसर ते हिंदी चे प्राध्यापक हा प्रवास होत गेला आणि सोबत एक कवी बहरत गेला...
आर. चंद्रानी एका काव्य संमेलनात त्यांच्या कविता ऐकल्या आणि आपल्या 'नई उमर कि नई फसल' या पुढच्या चित्रपटांत त्यांच्या एक , दोन नाही तर तब्बल आठ कविता घेतल्या. "कारवाँ गुजर गया गुबार देखते रहें" .... हि त्यातीलच एक कविता.
पुढे प्रेम पुजारी चित्रपट बनवतांना देव आनंद यांनी नीरज यांची ओळख एस. डी. बर्मन यांच्याशी करून दिली. तेव्हा बर्मनदांनी त्यांना 'रंगीला' शब्दापासून सुरु होणारं गाणं हव आहे असं सांगितलं. तेव्हा नीरज यांनी लिहिलेलं " रंगीला रे... तेरे रंग में यूं रंगा हें मेरा मन "या गाण्याने बर्मनदा थक्क झाले आणि म्हणाले,' I had given a difficult tune to fail you but you faile me with this gem of a number'.... या जोडीने नंतर शर्मिली, गॅम्बलर, तेरे मेरे सपने अशा एक से बढकर एक सिनेमांमधून आपल्याला अनेक हिट गाणी दिली .
एका मुलाखतीत नीरजजींनी एक आठवण सांगितली होती , बर्मनदांची ... एकदा बर्मनदांनी सुचवलं होतं कि शमा , परवाना , शराब, तमन्ना , इष्क हे शब्द गाण्यांत परत परत येतांत त्याऐवजी दुसरे वापर . म्ह्णून नीरज साहेबांनी बगिया , मधुर, माला , धागा , गीतांजली असे शब्द वापरले. हे वाचल्यावर मला "सासों कि सरगम , धडकन कि वीणा , सपनोंकी गीतांजली तू '.. तसंच "जीवन कि बगिया मेहेकेगी , लेहेकेगी ... खुषीयोन्की कलियां झुमेंगी फुलेंगी ".. या ओळी आठवल्या.
आजही देवानंदला रोमँटिक गाण्यांत पाहतांना नीरज साहेबांची आठवण आली नाही असं होतच नाही. ' चुडी नहीं ये मेरा दिल हें , फुलोंके रंग से दिलकी कलम से, मेरा मन तेरा प्यासा.. मेरा मन तेरा , हां मैने कसम ली हां तुने कसम ली नहि होंगे जुदा , दिल आज शायर हें गम आज नगमा हें '..या प्रत्येक गाण्यांत जीव ओतलाय त्यांनी.
"शोखियों में घोला जाए फुलोंका शबाब, उस में फिर मिलाई जाए थोडीसी शराब, होगा यूं नशा जो तैयार वो प्यार हें "... हे ऐकतांना तर या शब्दांच्याच प्रेमात पडतो.
"जैसे राधा ने माला जपी शाम कि मैने ओढी चुनरिया तेरे नाम कि ".. ऐकतांना आपणही नकळत हे गाणं गुणगुणू लागतो.
"मेघा छाये आधी रात बैरन बॅन गई निंदिया , बता ए मैं क्या करुं '... ऐकताना तो विरह डोळ्यांतून अलवार बरसू लागतो.
लिखे जो खत तुझे वो तेरे प्यार में हजारों रंग के नजारे बन गए असो अथवा खिलते हें गुल यहां खिलके बिखरने को .. आपल्या गाण्यातून त्यांनी अनेक रंगांच्या छटा उलगडल्या .
आपलं कवितेवरच प्रेम व्यक्त करताना एकदा त्यांनी म्हटलं होतं ,' I love composing poems so much that it has kept me intoxicated throughout my life'...
मला नेहमी वाटतं, आपण खरंच नशीबवान आहोत कि आपल्याला एवढ्या मोठ्या मोठ्या गीतकारांची गाणी मनसोक्त ऐकायला मिळाली , गुणगुणता आली आणि आयुष्यातील अनेक प्रसंगात याच गाण्यांनी आपल्याला सोबतही केली ...
( आजवर गीतकार नीरज यांच्याबद्दल जे काही वाचलं ते संदर्भ वापरून लिहायचा प्रयत्न केला आहे )
No comments:
Post a Comment