इवले इवले रूप गोजिरे
कुशीत बिलगून हसायचे
गळ्यांत टाकता हात चिमुकले
सर मोत्यांचे सजायचे
फुटले आतां पंख कोवळे
घरट्यामधूनी उडायचे
सावली अपुली असतांनाही
दूरूनी तूला ते पाहायचे
निसटून गेले क्षण स्पर्शाचे
चिऊकाऊच्या घासाचे
पुन्हा वाटते फिरुनी यावे
क्षण इवल्या त्या नात्याचे ....
No comments:
Post a Comment