एक पाऊस पुरतो,
आठवणीत हरवण्यासाठी
खरं तर,
पावसाचा आवाजही पुरेसा असतो
सगळंss सोडून मागे, परत जाण्यासाठी !
भिजलेलं अंगण, भिजलेला प्राजक्त
पागोळ्या वरून निथळणारं पाणी,
आजही ओळखीचं वाटतं
वळचणीला उभं राहता
आईचं तुळशी वृंदावन दिसतं !
समाधानाचं तेज मिरवीत
बाजूचं खोड भिजत असतं
रिमझिम पावसात समाधीस्त
स्वतःशीच बोलत असतं..
कानाकोपरा भिजून चिंब,
मळभ अजूनच गडद होतं
पाऊस फक्त निमित्त,
तेवढंच आईला भेटणं होतं !
No comments:
Post a Comment