या अंधाऱ्या पडछाया, हुरहूर मनी हा भास
क्षितिजावर अलगत उतरे, ती नक्षत्रांची माळ
दारात चांदणे फुलले, मारव्यात भिजले रान
पाचोळ्यास गंध अजूनी, गतजन्मीचा आभास
तो दूरून ऐकू येई , पावरीचा मंद आवाज
निःशब्दांमधूनी बरसे, डोळ्यांत जुने काहूर
हे युगायुगांचे नाते, हि युगायुगांची साथ
हलकेच आठवणींची, उलगडली रेशीम वीण
नात्यास न अपुल्या जरीहि, कोणतेच नाहि नाव
हि राधा तुझीच आहे अन माझा तू घनश्याम !!!
No comments:
Post a Comment