' नास्तिक ते आस्तिक … एक प्रवास '
रविवारी किशोरचा फोन आला, सागरमाथा सर करून पुण्यात आल्यावर त्या दिवशी फोन वर अभिनंदन केल पण खूप काही बोलता आल नाही म्हणून काल त्यानेच मुदाम फोन केला आणि मनसोक्त गप्पाही झाल्या.
जिथे लहानाचा मोठा झाला त्या परिसरात कौतुक सोहळा झाला, अगदी खास मराठमोळ्या पद्धतीत. एवरेस्ट मोहीमेवरून त्या दिवशी तो पुण्यात परत आला होता. काल बोलतांना फोनवर तोच आवाज , तोच आत्मविश्वास होतां आणि या वेळी त्याला समाधानाची झालर होती. जे ठरवल ते मिळाल्याची, मिळवल्याची…
मी म्हणाले "अरे आराम कर थोडे दिवस मग भेटूच ", तर म्हणाला " अग बँकेत निघालोय ".मी चकितच झाले. " यू आर सिम्पली ग्रेट , दोन दिवस पण नाही झाले तुला येवून आणि रुटीन सुरु , कसा आहेस तू ? तर म्हणाला " मी एकदम मजेत , १२ किलो वजन कमी झालय, थोडा थकवा आहे, बाकी फिट . कधी भेटायचं ते ठरव म्हणजे सगळे भेटू". एवरेस्ट मोहिमेवर निघायच्या आदल्या दिवशी शाळेच्या ग्रुप बरोबर कॉफी आणि गप्पा झाल्या होत्या आणि एवरेस्ट सर करून आल्यावर परत त्याच जागी भेटायच हे सुधा ठरल होतं.
आता न राहवून मी म्हटल, " तू जायच्या आधी नाही बोलले पण आता बोलल्याशिवाय राहवत नाहिये. गणपतीला नक्की जाउन ये आतां. मला माहिती आहे तुझा विश्वास नाही म्हणून जायच्या आधी नाही बोलले तुला, पण आता ऐक माझं .नक्की जा. " तो काहीच बोलला नाही. "एक सांग मला ,तुझा देवावर विश्वास नाही ? पण मग कधी वाटल का तुला समिट वर असताना कि काहीतरी नक्कीच आहे जिथे आपल्याला नमाव लागत ?" या प्रश्नावर फक्त हसला.… खरच त्याच उत्तर यावेळी बदलल होत.
तो म्हणाला, " आपली श्रद्धा, कष्ट, जिद्द कितीही खरी असली तरी 'तो' आहे हे पटल मला. माझ्यासारखा नास्तिक आस्तिक झाला. सर्व काही बाजूला ठेऊन त्या दिवशी त्या रोपला नमस्कार केला मी. बेस कॅम्प पासून वाटेत भेटलेल्या प्रत्येकाने काहीतरी दिलं , धागा, फोटो, छोटा विक्टरी FLAG आणि आशीर्वाद … सर्व काही बरोबर नेल मी . माहित नाही पण विश्वास ठेवावासा वाटला 'त्या प्रत्येकावर' … अग परत येतांना नेपाळ मध्ये दोन वेळा त्या पशुपतीनाथ मंदिरातहि गेलो , काय सांगू "… खूप छान वाटल ऐकून.
तो बोलत राहिला आणि मी विचारत … "एक सांग मला, कधी भीती नाही वाटली तुला No one has travelled the bridge of success without ever crossing the streets of failure" यावर त्यानी दिलेलं उत्तर खरच खास होतं . तो म्हणाला , " वाटली ना , सर्वात पहिल्यांदा १८ एप्रिलला बेस कॅम्पवर झालेल्या अपघातानंतर नेपाळ बरोबर चायना रूट सुधा बंद होईल का ? अशी शंका मनात आली . इथवर येवून रिकामं परतावं लागणार का ? याची भीती वाटली. पण नशिबाने साथ दिली आणि थोड्या उशिरा का होईना आमची चढाई सुरु झाली " बापरे , 'भीती' या शब्दाची त्याची आणि माझी व्याख्या खूपच वेगळी होती.
एक क्षण दोघंही गप्प होतो …

मग तोच म्हणाला, "अगं फक्त दीडशे मीटर अंतर उरलेलं असतांना एक जण परत फिरला. शेर्पाशी काही बोलला , मला समजल नाही तो काय म्हणतोय ते पण बहुदा म्हणाला असावा,' बास, आता नाही जाऊ शकत मी पुढे '. आणि माझ्या समोरून परतला . त्याच स्वप्न इतक्या जवळ होत आणि तो मात्र … मी विचार करून काही बोलणार तोवर तो मागे फिरला सुधा. त्याचा विचार करत मी पुढे जात होतो पण माझ मन मात्र मागेच राहिलं होतं . 'त्यानी असं अर्धवट सोडून जायला नको, मी का नाही थांबवायचा प्रयत्न केला त्याला ?' माझी पावलं मंदावली . त्याच्यासाठी मीच देवाला विनवू लागलो … माहित नाही काय झालं पण थोड्याच वेळांत आश्चर्य म्हणजे तो परत फिरून तिथवर आला होता अन् पाहता पाहता मला ओलांडून पुढे गेलाही. किती खुश झालो मी. खूप आनंद झाला त्याला पुढे जातांना पाहून, खूप वेगळ वाटल.…. हे ऐकून नकळत डोळ्यांत पाणी आलं.
या संपूर्ण प्रवासात किती वेगवेगळे अनुभव त्याने घेतले होते. अनेक वर्षांची अपार मेहनत, त्याची जिद्द आणि मनाची तयारी आम्ही जवळून पाहिली होती. आतून बाहेरून हालवून टाकणाऱ्या अनेक गोष्टी त्याने पाहिल्या होत्या अनुभवल्या होत्या पण जिद्द सोडली नव्हती कारण अनेक वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्नं त्याला पूर्ण करायचं होतं. त्याच्यामुळे नकळत आम्ही सुधा जोडले जात होतो … त्या एवरेस्टशी !!
"मला सांग , एवरेस्ट सर करण्याची अपेक्षित वेळ होती सकाळी सहा ते आठच्या मधे पण तूला जवळ पास दोन ते तीन तास उशीर झाला , तो का ? आम्ही बेस कॅम्पच्या सतत संपर्कात होतो. तुझ्या बरोबर असणाऱ्या दोघांनी सकाळी सातच्या सुमारास चढाई पूर्ण केली पण तू खूप वाट पहायला लावलीस. शेवटी तर आमचाही धीर सुटत चालला होता " मी अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. किशोर म्हणाला , " या वेळी फक्त दोन दिवस वातावरण अनुकूल होतं. त्यातील एक दिवस चायना नी आपल्या लोकांकरता राखीव ठेवला आणि दुसरा बाहेरील सर्वांकरता . जवळ पास तीनशे जण होतो आम्ही समिट करतां " माझ्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला " बापरे "… किशोर इतके 'वेडे 'इतके जण आहेत हे ऐकून मी नि:शब्द झाले.
'चायना रूट हा climbers route म्हणून प्रसिद्ध आहे , खरा गिर्यारोहक याच मार्गाने जातो आणि त्याच्या रक्तात असते ते फक्त स्वप्न , एवरेस्ट सर करण्याचे' , हे वाक्य कानांत तसंच रेंगाळल होत.
अजून विचारावं असं माझ्याकडे आणि सांगाव असं किशोरकडे खूप काही होतं पण प्रत्यक्ष भेटून ऐकायला काही गोष्टी तशाच ठेवल्या…

No comments:
Post a Comment