'तुझ्याशिवाय जगणं '
मन वेडे आजही, का तुझ्याविना हे व्याकुळते …
मनानं अखेर स्वीकारलं, ते तुझ्याशिवाय जगणं,
अन् अलगत जमायला लागलं, हे एकट एकट राहणं …
तरीही, अजून कधीतरी मन रेंगाळतेच, जुन्या श्वासात हरवते ,
स्वप्नामधील गोष्ट आपली, स्वप्नामधेच रंगवते …
प्रेमाची आर्जवे सारी, या डोळ्यामधेच साठवते,
निखळता तारा काळ्या नभी, आजही तो पाहते …
हातावरच्या रेषांमध्ये, अजूनी तूलाच शोधते,
मन वेडे आजही, का तुझ्याविना हे व्याकुळते …
No comments:
Post a Comment